By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:29 IST
1 / 9इराण आणि अमेरिका युद्धात जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील तणाव शिगेला पोहोचला असतानाच, आता 'मलक्का समुद्रधुनी'ने (Malacca Strait) संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. ही समुद्दधुनी आता जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. 2 / 9अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यात नुकताच एक संरक्षण करार झाला आहे. यामुळे आता या क्षेत्रावर अमेरिकेचा प्रभाव वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा मोठा परिणाम आशियाई अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.3 / 9या संरक्षण करारामुळे नेमके काय होऊ शकते? - नुकत्याच पार पडलेल्या या करारामुळे आता अमेरिकन लष्करी विमानांना इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत अधिक मुक्तपणे संचार करण्याची परवानगी मिळाली आहे. हा केवळ संरक्षण सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. मात्र प्रत्यक्षात यामुळे मलक्का समुद्दधुनीवरील अमेरिकेची ताकद आणि देखरेख वाढणार आहे. 4 / 9हा सागरी मार्ग हिंदी महासागर आणि पूर्व आशियाला जोडणारा एक मुख्य दुवा आहे. या मार्गावरून देलाशिवाय इतर वस्तूंची मोठ्या प्राणावर वाहतूक होते.5 / 9अशी आहे या समुद्रधुनीची 'खासियत' - होर्मुजची सामुद्रधुनी प्रामुख्याने तेल पुरवठ्यासाठी ओळखली जाते, तर मलक्का समुद्रधुनी ही ऊर्जा साधनांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक वस्तूंच्या वाहतुकीसाठी जगाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. 6 / 9हा मार्ग प्रामुख्याने पूर्व आशियातील देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चीन आपल्या ऊर्जेसाठी या मार्गावर सर्वाधिक अवलंबू आहे. महत्वाचे म्हणजे याला तो आपली कमजोरीही मानतो. यातच आता अमेरिकेचे येथील वाढते वर्चस्व, हे चीनसाठी मोठी दुविधाही ठरू शकते.7 / 9भारतासाठी रणनीतिक संधी; ठरणार गेमचेंजर? - मलक्कामधील ही बदलती समीकरणे भारतासाठी अत्यंत अनुकूल आहेत. भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांचे भौगोलिक स्थान या मार्गाच्या अगदी जवळ आहे. यामुळे भारताला नैसर्गिक फायदा मिळतो.8 / 9या परिसरता असलेली 'कॅम्पबेल बे' सारखी हवाई केंद्रे आणि तेथील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे भारताची सागरी शक्ती आणखी वाढत आहे. महत्वाचे म्हणजे, या स्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः चीनचा वाढता प्रभाव संतुलित करण्यासाठी.9 / 9या परिसरता असलेली 'कॅम्पबेल बे' सारखी हवाई केंद्रे आणि तेथील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे भारताची सागरी शक्ती आणखी वाढत आहे. महत्वाचे म्हणजे, या स्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः चीनचा वाढता प्रभाव संतुलित करण्यासाठी.