यंदाच्या हंगामामधील लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या आहेत.
यंदाच्या हंगामातील २३वा सामना RCB आणि LSG यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात विराट कोहलीसाठी इतिहास रचण्याची मोठी संधी असेल.
या सामन्यात, विराट कोहली तो पराक्रम करू शकतो जो आयपीएलच्या इतिहासात फक्त ख्रिस गेल आणि रोहित शर्मा या दोघांनाच करता आलेला आहे.
हा बहुचर्चित पराक्रम षटकारांच्या बाबतीत आहे. विराट कोहलीसा RCB vs LSG सामन्यात दमदार खेळी करून एक विक्रम करण्याची संधी मिळाली आहे.
विराट कोहली आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा तिसरा फलंदाज बनू शकतो. सध्या त्याच्या नावावर २६३ डावांत २९८ षटकार आहेत.
लखनौ विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने मारलेला दुसरा षटकार त्याला आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा तिसरा फलंदाज बनवेल.
ख्रिस गेलने १४१ डावांमध्ये ३५७ षटकार मारले आहेत. तर रोहितने आतापर्यंत २७६ सामने व २७१ डावांमध्ये ३१० षटकार ठोकले आहेत.