अमेरिकेसोबत वेगवेगळ्या विषयावर देवाण-घेवाण सुरू आहे. यात पाकिस्तान अजूनही मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत आहे, अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इराणकडून देण्यात आलेल्या या माहितीमुळे दोन्ही देश तणाव कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माइल बकाई यांनी सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यात जी चर्चा सुरू आहे, त्यात पाकिस्तान मध्यस्थाच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानातून आलेल्या एका शिष्टमंडळाचे आदरातिथ्य आज इराण करण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील ही चर्चा इस्लामाबादमध्ये संपलेल्या चर्चेचा पुढचा टप्पा असेल. यामध्ये इराण आणि अमेरिकेच्या मुद्द्यांवर आणि भूमिकेवर सविस्तरपणे चर्चा केली जाईल, असेही बकाई यांनी सांगितले.
आमचा ऊर्जा कार्यक्रम शांततापूर्ण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम अण्वस्त्रांसाठी असल्याचा आरोप केला होता. हा आरोप इराणने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता बकाई म्हणाले की, 'इराणचा ऊर्जा कार्यक्रम हा शांततापूर्ण वापरासाठीच आहे.'
'आम्ही आमच्या गरजांप्रमाणे युरेनियम शुद्धीकरण सुरूच ठेवणार आहोत. त्यासाठी सक्षम झाले पाहिजे. पण, युरेनियम संवर्धनाची श्रेणी आणि दर्जाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे', असेही त्यांनी सांगितले.
Web Summary : Iran confirms talks with the US, mediated by Pakistan. Discussions aim to ease tensions, building on Islamabad talks. Iran insists its nuclear program is peaceful, focusing on uranium enrichment for peaceful purposes.
Web Summary : ईरान ने अमेरिका के साथ पाकिस्तान की मध्यस्थता से बातचीत की पुष्टि की। इस्लामाबाद वार्ता के आधार पर तनाव कम करने के उद्देश्य से चर्चाएँ। ईरान ने जोर देकर कहा कि उसका परमाणु कार्यक्रम शांतिपूर्ण है।