शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 22:06 IST

Iran US Naval Blockade : अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिन्ही प्रमुख समुद्र बंद झाल्यास जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल?

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाने आता टोक गाठले आहे. अमेरिकेने होर्मुजची सामुद्रधुनी आणि इराणच्या बंदरानजीक १० हजार कमांडो तैनात करून 'अवैध नौसैनिक नाकेबंदी' लागू केल्यानंतर, इराणने जगाला हादरवणारी धमकी दिली आहे. जर अमेरिकेची ही कारवाई थांबली नाही, तर इराण फारसची खाडी, ओमानची खाडी आणि लाल समुद्र या तिन्ही महत्त्वाच्या जलमार्गांतून होणारा संपूर्ण आयात-निर्यात व्यापार रोखून धरेल.

इराणी सैन्य मुख्यालयाने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेची ही कृती नुकत्याच झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन आहे. अमेरिकन युद्धनौका इराणी तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याने, इराणने आता प्रति-नाकेबंदीची घोषणा केली आहे. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापाराचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे.

इराणचा 'प्लॅन-बी': तिन्ही समुद्र बंद करणार!१. आयात-निर्यात शून्यावर: जर अमेरिकेने होर्मुजवर नाकेबंदी केली, तर इराण पर्शियन खाडी आणि ओमानच्या समुद्रात कोणत्याही प्रकारच्या आयात-निर्यात हालचालींना परवानगी देणार नाही.२. लाल समुद्रावर ताबा: अमेरिकन नौदलाने आपला हट्ट सोडला नाही, तर इराणची सशस्त्र सेना लाल समुद्राच्या मार्गावरून होणारा जागतिक व्यापार पूर्णपणे ठप्प करेल.३. जगाला बसणार फटका: या नाकेबंदीमुळे केवळ इराणचेच नाही, तर जगाचा २० ते ३० टक्के व्यापार ज्या मार्गावरून चालतो, तो मार्गच बंद करण्याची तयारी इराणने दर्शवली आहे.

सर्वात धक्कादायक म्हणजे इराणने लाल समुद्रातील वाहतूक बंद करण्याची धमकी दिली आहे. भौगोलिकदृष्ट्या लाल समुद्र इराणपासून दूर असला, तरी इराणच्या या घोषणेमुळे सौदी अरबची अडचण वाढणार आहे. होर्मुज बंद झाल्यानंतर सौदी अरब लाल समुद्राच्या मार्गे तेल निर्यात करत आहे. आता हा मार्गही धोक्यात आला आहे. जगातील १५% समुद्री व्यापार आणि ३०% कंटेनर वाहतूक याच मार्गाने स्वेज कालव्याद्वारे होते.

ऊर्जा बाजारात हाहाकार माजण्याची शक्यताफारसच्या खाडीतून जगाचा २० टक्क्यांहून अधिक तेल पुरवठा होतो. अमेरिकेच्या १० हजार कमांडोंनी आधीच होर्मुजमधील वाहतूक शून्यावर आणली आहे. आता इराणने तिन्ही बाजूने रस्ता रोखल्यास कच्च्या तेलाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचू शकतात, ज्याचा थेट परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल.

ट्रम्प यांची नवी खेळी: होर्मुज उघडणार?दरम्यान, बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान करत 'होर्मुज स्ट्रेट' पुन्हा उघडण्याबाबत भाष्य केले आहे. मात्र, इराणने याकडे केवळ एक राजकीय डावपेच म्हणून पाहिले असून, जोपर्यंत अमेरिकन नौदल आणि १० हजार कमांडो मागे हटत नाहीत, तोपर्यंत तणाव कमी होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Threatens Trade Halt: Retaliation for US Naval Blockade

Web Summary : Iran threatens to block key sea routes (Persian Gulf, Oman Sea, Red Sea) in response to the US naval blockade. This could disrupt 20-30% of global trade and send oil prices soaring, impacting the global economy. Trump hinted at reopening Hormuz Strait, but Iran demands US withdrawal.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिका