शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : वडगावशेरीत घड्याळाचा ‘गजर’,जगदीश मुळीक यांना धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 20:17 IST

Pune Elecion Result 2019 : वडगावशेरीत मतदारांकडून पुन्हा घड्याळाला पसंती.. 

ठळक मुद्देसुनील टिंगरे  यांना ९७,७०० तर; जगदीश मुळीक यांना ९२,७२७ मतेपहिल्या आठ फे-यांमध्ये सुनील टिंगरे यांनी १६ हजार ५७९ आघाडी घेतली होतीवंचित,एमएमआय ‘फॅक्टर’ चालला नाहीसुनील टिंगरे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली

पुणे: वडगावशेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी अटीतटीच्या लढतीत अखेर विजयश्री खेचून आणली.पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची आघाडी टिंगरे यांनी शेवटच्या फेरी अखेरपर्यंत कायम ठेवली. टिंगरे यांना ९७ हजार ७०० मते तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगदीश मुळीक यांना ९२ हजार ७२७ मते मिळाली. त्यामुळे टिंगरे यांनी ४ हजार ९७५ मतांनी विजय मिळवत वडगावशेरीत घड्याळाचा ''गजर'' केला.पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी वडगावशेरी विधानसभा मतदार संघात २ लाख १४ हजार मतदान झाले होते.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी २२ फे-यांचे नियोजन केले होते. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आणि दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली.पहिल्या फेरीपासून आठव्या फेरीपर्यंत टिंगरे यांनी मुळीक यांच्यापेक्षा प्रत्येक फेरीत नेहमीच अधिक मते घेतली.या आठही फे-यांमध्ये टिंगरे यांनी मुळीक यांच्यापेक्षा १६ हजार मतांची आघाडी घतली होती. मात्र, नवव्या फेरीत मुळीक यांनी टिंगरे यांच्यापेक्षा १ हजार ५४८ मते अधिक घेतली. तसेच मुळीक यांनी अकराव्या १ हजार ४४६ मते ,बाराव्या फेरीत १ हजार ९०२ , तेराव्या फेरीत १ हजार ९२२ ,चौदाव्या फेरीत १ हजार ३०१, सतराव्या फेरीत ८९५ मते , एकोणिसाव्या फेरीत २ हजार २४३ मते , विसाव्या फेरीत २ हजार १९७ आणि एकविसाव्या फेरीत २ हजार ६५ अधिक मते घेतली.त्यामुळे मुळीक यांनी टिंगरे यांची १६ हजार मतांची आघाडी २१ साव्या फेरीपर्यंत कमी करत आणली. परंतु, शेवटपर्यंत मुळीक यांना टिंगरे यांना मागे टाकला आले नाही.अखेर बारावीसाव्या फेरीत अंतिम पाच पेट्यांमधील मतांची मोजणी झाल्यावर टिंगरे यांचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले.---------------------------वडगावशेरीतील उमेदवारांना मिळालेली मते उमेदवाराचे नाव                          मिळालेली मते सुनील टिंगरे (राष्ट्रवादी)                 ९७,७००जगदीश मुळीक (बीजेपी)                ९२,७२५प्रविण गायकवाड (वंबआ)              १०,२९८डॅनिअल लांडगे (एमआयएम )        ७,७०२राजेश बेंगळे                                  १६५३गणेश ढमाले                                  ९०८सविता औटी                                  २९८शशिकांत राऊत                             २०४प्रकाश पारखे                               १९८प्रसाद कोरडे                                १७४जितेंद्र भोसले                             १४८विठ्ठल गुल्हाणे                           १७७    नोटा                                   २,४१७-----------------

पहिल्या आठ फे-यांमध्ये सुनील टिंगरे यांनी १६ हजार ५७९ आघाडी घेतली होती.त्यामुळे जगदीश मुळीक यांना १६ हजारांची आघाडी मागे टाकणे अवघड दिसत होते.त्यामुळे सुनील टिंगरे विजय होतील, असे चित्र आठव्या फेरीपासूनच निर्माण झाले होते.

*  वडगावशेरीतील निकालाची वैशिष्टे सुनील टिंगरे यांना ४५.२१ टक्के मते  मुळीक यांना ४३.२१ टक्के मते  वंचित,एमएमआय ‘फॅक्टर’ चालला नाहीसुनील टिंगरे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवलीवडगावशेरीत मतदारांकडून पुन्हा घड्याळाला पसंती 

टॅग्स :Puneपुणेvadgaon-sheri-acवडगाव शेरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा