शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : खडकवासल्यात चुरशीच्या लढतीत दोडके पराभूत , तापकीरांची हॅट्ट्रिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 20:29 IST

Pune Election Result 2019 : खडकवासला मतदारसंघामधे सात उमेदवार उभे होते

ठळक मुद्दे२ हजार ५९५ मतांनी विजयदोडकेंचा फेरमोजणीचा अर्ज फेटाळला

पुणे : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांना भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्याकडून अवघ्या २५९५ मतांनी पराभव पत्करावा लागला. तापकीर यांनी १ लाख २० हजार ५१८ मते मिळवित विजयाची हॅट्ट्रिक केली. तर, दोडके यांनी १ लाख १७ हजार ९२३ मते मिळवित अपयशी झुंज दिली. खडकवासला मतदारसंघामधे सात उमेदवार उभे होते. या मतदारसंघात ४ लाख ८६ हजार ९४८ मतदार असून, त्यातील २ लाख ५० हजार ७१ (५१.३५ टक्के) जाणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १ लाख ३७ हजार ३६६ पुरुष आणि १ लाख १२ हजार ७०५ स्त्रियांनी मतदान केले. मुख्य लढत तापकीर आणि दोडके यांच्यामधे झाली. दोडके यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. पहिल्या फेरीत दोडके यांनी ६ हजार ९४८ तर तापकीर यांनी ३ हजार ४१६ मते होती. ही आघाडी पाचव्या फेरीला १३ हजार ३१ मतापर्यंत वाढली. त्यानंतर दोडके यांची आघाडी घटत गेली. अखेरीस १३ व्या फेरीस ७० मतांची किरकोळ आघाडी तापकीर यांना मिळाली. त्यानंतर अगदी १९व्या फेरीपर्यंत दोघांमधे चार-पाचशे मतांचा फरक होता. तापकीर यांनी विसाव्या फेरीत १ लाख ५ हजार ९२८ आणि दोडके यांना १ लाख ३ हजार ७४४ मते मिळविली. तेविसाव्या फेरीत तापकीर यांना १ लाख १८ हजार ६२७ आणि दोडके यांना १ लाख १६ हजार १२ मते मिळाली. त्यात त्यांना २११५ मतांची आघाडी होती. टपाली १४३ मते धरुन तापकीरांची आघाडी २२५८ झाली. तांत्रिक कारणांमुळे ५ यंत्रांच्या मतदार चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. त्यातही २३०० मते होती. त्यामुळे दोडके यांचा पराभव त्याच वेळी निश्चित झाला. वंचित बहुजन आघाडीच्या अप्पा आखाडे यांना तिसºया क्रमांकाची ५,९३१ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीच्या अरुण गायकवाड यांना ११८२, बहुजन मुक्ती पार्टीच्या अ?ॅड. राहुल बगाडे यांना ६५७ मते मिळाली. अपक्ष दीपक बलाढे यांना २६६ आणि बाळासाहेब पोळ यांना ३३४ मते मिळाली. या उमेदवारांपेक्षा नोटाला ३,५६१ इतकी मते आहेत. ---------------------------

पाच मतदान पेट्यांमुळे निकाल लांबलातीन मतदान यंत्राचे कंट्रोल युनिट-डिस्प्ले बंद होते. तर, दोन यंत्रातील झालेले मतदान आणि मतदानाच्या दिवशी यंत्र सील करताना नोंदलेल्या मतामधे एक-दोन मतांची तफावत होती. या पाचही यंत्रातील व्हीव्हीपॅटमधील मतदार चिठ्ठी मोजण्यात आली. झालेल्या मतदानामधे कोणतीही तफावत आढळली नाही. --------------------दोडकेंचा फेरमोजणीचा अर्ज फेटाळलाराष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांनी आंबादास जाधव यांच्यामार्फत मतदारसंघातील सर्व ४४६ मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटमधील मतदार चिठ्ठी मोजण्याची मागणी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी ही मागणी फेटाळली. 

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा