Pune Temperature:'लोहगाव' बनले हॉटस्पॉट; तापमान ४१ .८ अंशाच्या घरात, मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 19:29 IST2026-04-15T19:28:30+5:302026-04-15T19:29:04+5:30

निवृत्तीनंतर स्थायिक होण्यासाठी पुण्याचा विचार केला जायचा. मात्र, आज अशी परिस्थिती आहे की पुण्यात राहतोय की राजस्थानात असा प्रश्न पडत आहे

'Lohgaon' becomes hotspot; Temperature at 41.8 degrees Celsius, heat intensity more in suburbs than central area | Pune Temperature:'लोहगाव' बनले हॉटस्पॉट; तापमान ४१ .८ अंशाच्या घरात, मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक

Pune Temperature:'लोहगाव' बनले हॉटस्पॉट; तापमान ४१ .८ अंशाच्या घरात, मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक

पुणे: शहरात मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. लोहगाव च्या कमाल तापमानाचा पारा ४१.८ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला असून, लोहगाव हे शहरातील सर्वाधिक 'हॉटस्पॉट' ठरत आहे. वाढते काँन्क्रीटीकरण, कमी होत चाललेली वृक्षसंपदा या गोष्टी उपनगरांमधील वाढत्या तापमानाला कारणीभूत ठरत आहेत.

काही दिवसांपासूनच शहरात उन्हाचा तडाखा वाढत चालला असून, 'सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. कडक ऊन आणि असह्य उकाडयाने पुणेकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. पूर्वी पुणे हे आल्हाददायी वातावरणासाठी ओळखले जायचे. निवृत्तीनंतर स्थायिक होण्यासाठी पुण्याचा विचार केला जायचा. मात्र, आज अशी परिस्थिती आहे की पुण्यात राहतोय की राजस्थानात असा प्रश्न पडत आहे.

बुधवारी ( दि.15) शिवाजीनगर येथे ३९.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली असली तरी लोहगाव तापलेलेच आहे. लोहगावमधील पारा ४० अंशांच्या पुढेच आहे. दरम्यान, पुण्याच्या तापमानाचा गेल्या दशकातील आढावा घेतला तर एप्रिलमधील वार्षिक सरासरी तापमानात २०१६ पासून सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवले आहे. २०१६ ते २०२२ दरम्यान एप्रिल महिन्यात ४० से. ते ४१.५ अंश सेल्सिअस तापमान राहिले असून, कमाल तापमानात सरासरी १ ते २ अंशांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यात ३० एप्रिल १८९७ रोजी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. २०२३ मध्ये कोरेगाव पार्क परिसरात ४४.४ अंश सेल्सिअसच्या घरात तापमान पोहोचले होते. जे आतापर्यंतचे विक्रमी तापमान ठरले आहे. तर 2025 मध्ये शहरात ४३.६ इतक्या कमाल तापमानाच्या नोंदीने १२८ वर्षातील कमाल तापमानाचा विक्रम मोडीत काढला.

वर्ष - एप्रिल/मे मधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

* २०२२ | ४० ते ४१.५
* २०२३ - ४४.४ (कोरेगाव पार्क)
* २०२४ -४२.१. ( सलग १२ दिवस ४० अंशांच्या वर )
* २०२५- ४३.६ ..(१२८ वर्षातील कमाल तापमानाचा विक्रम मोडीत )
* २०२६ (चालू) | ४१.८ लोहगाव (दि. १५ एप्रिल, )

Web Title : पुणे में गर्मी: लोहगांव सबसे गर्म; उपनगर शहर से अधिक तपते हैं।

Web Summary : लोहगांव 41.8 डिग्री सेल्सियस के साथ पुणे का सबसे गर्म स्थान बना। शहरीकरण और कम हरियाली के कारण उपनगरों में भीषण गर्मी है। अप्रैल का तापमान लगातार बढ़ रहा है, रिकॉर्ड टूट रहे हैं। 2025 में 43.6 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, जो 128 वर्षों में सबसे अधिक है।

Web Title : Pune sizzles: Lohegaon hottest; suburbs hotter than city center.

Web Summary : Lohegaon hits 41.8°C, becoming Pune's hotspot. Suburbs face intense heat due to urbanization and less greenery. April temperatures consistently rise, breaking records. 2025 saw 43.6°C, a 128-year high.