शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या बाइकला मिळाला मराठमोळा ‘टच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 14:39 IST

जगभरातील तरुणांंना वेड लावणाऱ्या सात बाइकचे केले डिझाईन 

ठळक मुद्देमूळचा सोलापूरचा असलेल्या चेतनला बाईक आणि कार डिझाईनचे धडे मिळाले ते पुण्यातूनच

दीपक होमकर- पुणे :  तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या दमदार अन् लाखमोलाच्या दुचाकीला मराठमोळा ह्यटचह्ण देण्याची किमया मराठी तरुणाने केली आहे. त्याचे नाव चेतन शेडजाळे. याने अनेक दुचाकींना विविध प्रकारचे डिझाईन तयार केले आहेत.  मूळचा सोलापूरचा असलेल्या चेतनला बाईक आणि कार डिझाईनचे धडे मिळाले ते पुण्यातूनच. डिझाईनचं जागतिक माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या इटलीमधील मिलान युनिव्हर्सिटीच्या दारापर्यंतचा त्याचा रस्ताही पुण्यातूनच गेला. अभ्यासामध्ये सर्वसाधारण असणाऱ्या चेतनने सोलापुरातील श्राविकामधून शालेय शिक्षण पूर्ण केले. दहावीत पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही ऑक्टोबरमध्ये उत्तीर्ण होऊन त्याने जैन गुरुकुल येथे शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. रसायनशास्त्राचेचे प्राध्यापक असलेले चेतनचे वडील सुहास शेडजाळे यांनी चेतनची चित्रकलेची आवड पाहून त्याला आर्किटेक्चर महाविद्यालयात प्रवेश घेऊ दिला आणि तिथून चेतनमध्ये लपलेला खरा डिझायनर बहरण्यास सुरुवात झाली. आर्किटेक्चरची एन्ट्रन्सशिप करताना सामान्यत: सारीच मुले बिल्डिंग कंस्ट्रक्शन कंपनीत अनुभव घेण्यासाठी पुण्यात येतात; मात्र चेतनने थेट बंगळुरू गाठले आणि तेथे कार डिझाईनमध्ये रुची दाखविली. तेथील संचालक नागराज आणि प्रणोती यांनी चेतनला कार आणि मोटारसायकल डिझाईनमध्येच करिअर करण्यास सुचविले. त्याबाबतची माहिती घेतल्यावर परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुण्यात क्लास लावला. इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले आणि अखेर इटलीतील जगविख्यात मिलान युनव्हर्सिटीमध्ये त्याला प्रवेश मिळाला. वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याच देशतील एका कंपनीत त्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली आणि त्याची चुणूक पाहून त्याला तिथेच पहिली नोकरी मिळाली. त्या वेळी त्याने अनेक बाइकचे डिझाईन बनविले. आपण बनविलेल्या सर्वच बाइकचे होत असलेले कौतुक पाहून त्याने नोकरी सोडली आणि स्वत:ची कंपनी स्थापन केली. या माध्यमातून जगभरातील विविध दुचाकी बनविणाºया कंपन्यांना त्यांनी बाइकची डिझाईन बनवून दिली. सुमारे दोन वर्षांनी त्याला हार्ली डेव्हीडसन यांच्याकडून मेल आला आणि चेतनचे इटलीतून अमेरिकेत प्रयाण झाले. दोन वर्षे कंपनीला बाइकचे डिझाईन देतानाच कंपनीने सिनिअर डिझाईनरची ऑफर दिली आणि त्यानंतर एकामागे एक अशा तब्बल सात बाईक चेतनच्या हातून साकारल्या गेल्या......असे सुचते डिझाईन...तरुणांना कशी बाईक हवी आहे, याबाबत या महागड्या दुचाकीच्या कंपनीकडून जगभर सातत्याने सर्वेक्षण सुरू असते. तो सारा डेटा कंपनीकडून डिझाईनरसमोर ठेवला जातो व तरुणांच्या स्वप्नातील बाईकचा प्रत्यक्ष आकार-उकार करण्याचे आव्हान डिझाईनरसमोर असते. बाईक डिझाईन करताना केवळ त्याचे दिसणे महत्त्वाचे नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या इंजिनाची रचना कशी, चाकांचा आकार, हँडलबार व त्याला साजेसे हेडलाईट, टेललाईट या साऱ्या गोष्टींची तांत्रिक माहिती लक्षात घेऊन बाईकची रचना करावी लागते. अशा साऱ्या गोष्टींचे तंत्र लक्षात घेऊन चेतनने अनेक बाइकचे डिझाईन केले आणि प्रत्यक्षात रोडवर अवतरलेल्या बाइकने टोमोबाईल क्षेत्रात धूम उडवली.   मिलवॉकी-८ या पहिल्या बाइकचे डिझाईन करताना गणपतीचा आकार त्याच्या नजरेसमोर आला. त्याचे इंजिन त्याला गणेशाच्या कानाच्या आकाराचे भासत होते, तर सायलेन्सरचा मार्ग सोंडेच्या रूपात. प्रत्येक बाइकच्या डिझाईन वेळी विविध आकार त्याच्या डोक्यात असतात व त्यावर मेहनत घेऊन त्या पेन्सीलच्या साह्याने कागदावर स्केचच्या रूपात उतरतात.सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आहे असे सांगितले जात असले, तरी युवकांनी ही मंदी म्हणजेच खरी संधी असल्याचे मानून या क्षेत्रात आले पाहिजे. याच दरम्यान तुमच्यातील टॅलेंट सिद्ध करण्याची संधी तुम्हाला अधिक असते. भविष्यात इलेक्ट्रिक कार व मोटारसायकलचा जमाना असून त्याच्या डिझाईनकडे तरुणांनी अधिक लक्ष दिल्यास या क्षेत्रात मोठे करिअर करता येईल. - चेतन शेडजाळे, सिनिअर डिझाईनर

टॅग्स :Puneपुणेbikeबाईक