Pune: दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टेम्पोची धडक; अंगावरून गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:12 IST2026-05-05T11:11:22+5:302026-05-05T11:12:39+5:30

या घटनेनंतर पुन्हा एकदा वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचेही समोर आले आहे

Couple riding a bike hit by tempo; Wife dies on the spot, husband seriously injured | Pune: दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टेम्पोची धडक; अंगावरून गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

Pune: दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टेम्पोची धडक; अंगावरून गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

पुणे : पुण्यातील तळेगाव आंबी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. आयशर टेम्पोच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला टेम्पो चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो त्यांच्या अंगावरून गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आंबी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : पुणे: बाइक पर जा रहे दंपत्ति को टेम्पो की टक्कर, पत्नी की मौत, पति घायल

Web Summary : पुणे के तलेगांव आंबी में एक तेज रफ्तार टेम्पो ने बाइक सवार दंपति को टक्कर मार दी, जिससे पत्नी की मौके पर ही मौत हो गई। पति गंभीर रूप से घायल हो गया। घटना सड़क सुरक्षा पर सवाल उठाती है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pune: Tempo hits couple on bike; wife dies, husband injured.

Web Summary : In Pune's Talegaon Ambi, a speeding tempo hit a couple on a bike, killing the wife instantly. The husband is seriously injured. The incident raises concerns about road safety. Police are investigating.