शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:49 IST

सकाळी दिंडी जुना पुणे मुंबई महामार्ग क्रॉस करताना पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर अतिशय वेगाने येऊन वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला

पवनानगर: कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी येथे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला आज सकाळी भीषण अपघात झाला. कामशेत परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने वारकऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातात एका महिला वारकरीचा जागीच मृत्यू झाला असून दहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उरण-पनवेल येथील जसळी दिंडी गेल्या चार दिवसांपूर्वी आळंदी कडे निघाली होती. आज सकाळी कामशेत येथे जुन्या पुणे मुंबई हायवेवर वारकरी मंडळींनी चहा-नाश्ता करून रस्ता ओलांडत असताना भरधाव कंटेनरने १० ते १२ वारकऱ्यांना जोराची धडक दिली. या अपघातात प्रियंका तांडेल (वय ५५, रा. करळ, ता. उरण, जि. रायगड) या महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत असलेले वारकरी कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमी वारकऱ्यांची नावे:

१)दत्तात्रय विष्णु घरत (वय ६५, रा. चिरनेर, ता. उरण)२) हिराबाई पोसा पाटील (वय ६५, रा. चिरले, ता. उरण)३)कामिनी दत्तात्रय गांधी (वय २८, रा. चिरले, ता. उरण)४)अपर्णा अनंत ठाकूर (वय ५०, रा. जासाई, ता. उरण)५)नंदू अप्पा चोपडे (वय ५५, रा. नायगाव, ता. मावळ)६)ज्ञानदेव निवृत्ती गाडे (वय ५५, रा. नाणोली, ता. मावळ)७)तान्हाजी पुनाजी हेमाडे (वय ४०, रा. वडेश्वर, ता. मावळ)८)प्रभाकर लक्ष्मण तांडेल (वय ६२, रा. करळपाडा, ता. उरण)९) शारदा ठाकूर (वय ४५, रा. जासाई, ता. उरण)१०)जंदाळा अशोक कुमार (वय ३०, रा. जासाई, ता. उरण)

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वारकरी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढल्याचे समजते. कामशेत पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Container hits pilgrim procession: One dead, ten injured on highway.

Web Summary : A container truck struck a Warkari procession on the old Pune-Mumbai highway near Kamshet, killing one woman and injuring ten others, four seriously. The pilgrims were en route to Pandharpur. Protests erupted at the scene.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkamshetकामशेतAccidentअपघातvarkariवारकरीekadashiएकादशीWomenमहिलाhighwayमहामार्ग