भाजपला १३ प्रभाग समितीचे अध्यक्षपद, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक, तुमच्या प्रभागाचा अध्यक्ष कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:51 IST2026-04-22T10:51:06+5:302026-04-22T10:51:16+5:30

महापालिका निवडणुकीनंतर १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना प्रशासनाकडून केली असून १४ ठिकाणी भाजप तर एक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे

BJP gets 13 ward committee president posts, Congress and NCP get one each, who is the president of your ward? | भाजपला १३ प्रभाग समितीचे अध्यक्षपद, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक, तुमच्या प्रभागाचा अध्यक्ष कोण?

भाजपला १३ प्रभाग समितीचे अध्यक्षपद, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक, तुमच्या प्रभागाचा अध्यक्ष कोण?

पुणे: पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्ष भाजपला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना प्रत्येकी एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे प्रभाग समित्यावर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

महापालिका निवडणुकीनंतर १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना प्रशासनाकडून केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेनुसार पक्षीय बलाबलानुसार १४ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे, तर काँग्रेसला एक प्रभाग समिती मिळणार होती. प्रशासनाच्या रचनेत झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही प्रभाग समिती मिळू शकणार नाही, याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच मुख्यमंत्र्यांकडे क्षेत्रीय कार्यालयांच्या चुकीच्या पुनर्रचनेची तक्रार केली होती. या मागणीनुसार तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने पालिकेला दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात १३ प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध झाली होती. येरवडा वडगावशेरी आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून सतीश राउत यांची नियुक्ती करण्यात आली होती.

येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या कविता गलांडे आणि काँग्रेसच्या विशाल मलके यांच्यामध्ये निवडणूक झाली. भाजपच्या कविता गलांडे यांची ८ विरुद्ध ४ मतांनी विजयी झाल्या. ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुरेखा कवडे आणि काँग्रेसच्या वैशाली भालेराव यांच्यामध्ये निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुरेखा कवडे यांची ५ विरुद्ध ३ मतांनी विजयी झाल्या. पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष भाजपला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रत्येकी एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे प्रभाग समित्यावर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

प्रभाग समिती आणि अध्यक्षांचे नाव

नगररोड वाघोली क्षेत्रीय-अनिल सातव, छत्रपती शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय-अमृता म्हेत्रे, औंध बाणेर क्षेत्रीय-रोहिणी चिमटे, कोथरूड बावधन क्षेत्रिय - वासंती जाधव , वारजे कर्वेनगर क्षेत्रीय - मंजुश्री खर्डेकर, सिंहगड रोड - सचिन मोरे, धनकवडी कात्रज आंबेगाव क्षेत्रीय - प्रतिभा चोरघे, कोंढवा उंड्री क्षेत्रीय - रंजना टिळेकर, हडपसर मांजरी क्षेत्रीय - प्रशांत उर्फ मामा तुपे, बिबवेवाडी क्षेत्रीय- मनीषा चोरबेले, कसबा पेठ क्षेत्रीय-उज्ज्वला यादव, विश्रामबागवाडा क्षेत्रीय-राघवेंद्र मानकर, येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय - कविता गलांडे वरील सर्व अध्यक्ष भाजप), वानवडी क्षेत्रीय-साहिल केदारी (काँग्रेस), ढोले पाटीलरोड क्षेत्रीय-सुरेखा कवडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

Web Title : पुणे समिति प्रमुखों पर भाजपा का दबदबा; कांग्रेस, एनसीपी को एक-एक पद

Web Summary : पुणे की वार्ड समितियों में भाजपा का दबदबा, 13 अध्यक्ष पद हासिल। कांग्रेस और एनसीपी (अजित पवार) को कथित पुनर्गठन संबंधी चिंताओं के बाद एक-एक पद मिला। शेष पदों के लिए चुनाव हुए।

Web Title : BJP Dominates Pune Committee Heads; Congress, NCP Secure One Each

Web Summary : Pune's ward committees see BJP dominance with 13 chairmanships. Congress and NCP (Ajit Pawar) secured one each after reported restructuring concerns. Elections took place for remaining positions.