शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Election Results 2026: सुनेत्रा पवार यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु; ८ व्या फेरीअखेर तब्बल ७० हजार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:04 IST

Baramati By Election Results 2026: दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले असून, त्यापैकी एक लाख ६५ हजार २६६ मते मिळाली, तरच मताधिक्याचा विक्रम होण्याची शक्यता आहे

बारामती : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ५२.४४ टक्के मतदान झाले आहे. पोटनिवडणुकीसाठी पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, विरोधी उमेदवारांमध्ये एकही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडल्याचे चित्र आहे. विरोधी उमेदवारांनी केवळ उमेदवारी कायम ठेवली, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही.

आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळपासूनच आघडीवर आहेत. ८ व्या फेरी अखेर एकूण सुनेत्रा पवारांना आतापर्यंत ७० हजार ६४२ मते मिळाली आहेत. तर इतरांना १ हजार २८९ मते मिळाली आहेत. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार आहेत. 

विजयाच्या दिशेने वाटचाल 

सध्याची अपडेट पाहता सुनेत्रा पवार यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या पोटनिवडणुकीत दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले असून, त्यापैकी एक लाख ६५ हजार २६६ मते मिळाली, तरच मताधिक्याचा विक्रम होणार आहे. हा ‘जादुई आकडा’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गाठणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar leads in Baramati bypoll; heading towards victory.

Web Summary : Sunetra Pawar is leading in the Baramati by-election after her husband's death. With main opponents absent, she secured over 70,000 votes by the eighth round. The bypoll saw 52.44% voter turnout. Pawar aims to reach 165,266 votes for a record.
टॅग्स :baramati-acबारामतीSunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूक 2026VotingमतदानMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६