साडेतीन हजार चोरल्याचा आरोप; पुण्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यात जाऊन उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 11:57 IST2026-04-20T11:57:33+5:302026-04-20T11:57:57+5:30

यशोतेज अकॅडमीच्या वॉर्डनने रूम पार्टनरचे सुमारे साडेतीन हजार रुपये चोरी केल्याचा आरोप विद्यार्थ्यावर केला होता

Accused of stealing Rs 3,500; 16-year-old student in Pune takes extreme step after getting depressed | साडेतीन हजार चोरल्याचा आरोप; पुण्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यात जाऊन उचलले टोकाचे पाऊल

साडेतीन हजार चोरल्याचा आरोप; पुण्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यात जाऊन उचलले टोकाचे पाऊल

पुणे : एनडीएसाठी प्रशिक्षण देणाऱ्या निवासी प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्यावर पैशांची चोरी केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला अकॅडमीतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी यशोतेज अकॅडमीचे संस्थापक, संचालक, सीईओ, तसेच वॉर्डन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अवधूत उल्हास बडे (वय १६, रा.बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील उल्हास म्हातारदेव बडे (वय ५४, रा.माउली निवास, आनंदनगर, बीड) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये तेजस पद्याकर पाटील (वय ३२, रा.गमन उन्नती टॉवर्स, कात्रज-कोंढवा रोड), विकास सुरेश पाटील (वय ३२, रा.यशोतेज अकॅडमी, हांडेवाडी) आणि वॉर्डन वसंत तुकाराम सरकटे (वय ५५, रा.यशोतेज अकॅडमी, हांडेवाडी) यांचा समावेश आहे. ही घटना १० नोव्हेंबर २०२५ रोजी हांडेवाडी येथील यशोतेज अकॅडमीच्या निवासी खोलीत घडली. अवधूत बडे हा अकरावीमध्ये शिक्षण घेत होता आणि अकॅडमीच्या वसतिगृहात राहत होता. त्याच्या रूम पार्टनरचे सुमारे साडेतीन हजार रुपये चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. या प्रकरणी वॉर्डन वसंत सरकटे यांनी त्याला अकॅडमीतून रेस्टिकेट करण्याची माहिती दिली.

या दबावामुळे अवधूत नैराश्यात गेला, तसेच अकॅडमी प्रशासनाने या घटनेची माहिती विद्यार्थ्याच्या नातेवाइकांना दिली नाही आणि त्याला योग्य समुपदेशनही उपलब्ध करून दिले गेले नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अकॅडमीच्या संस्थापक, संचालक व सीईओ यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे आणि योग्यवेळी उपाययोजना न केल्यामुळे अवधूत नैराश्यातून बाहेर पडू शकला नाही. परिणामी, त्याने आपल्या खोलीत सिलिंग फॅनला बेडशिटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शंभुराज जाधव करत आहेत.

Web Title : पुणे: चोरी के आरोप के बाद एकेडमी में किशोर ने की आत्महत्या

Web Summary : पुणे में एक 16 वर्षीय छात्र ने चोरी के आरोप के बाद आत्महत्या कर ली। निष्कासन का सामना करते हुए, उसने अपने कमरे में अपनी जान दे दी। पुलिस ने लापरवाही और सहायता प्रदान करने में विफल रहने के लिए अकादमी के अधिकारियों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Pune: Teen Commits Suicide After Theft Accusation at Academy

Web Summary : A 16-year-old student in Pune committed suicide after being accused of theft at his academy. Facing expulsion, he took his life in his room. Police have filed a case against the academy's officials for negligence and failing to provide support.