ट्रॅक्टरच्या धडकेने ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मृतदेहासह ठाण मांडून बसल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, इंदापूरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 20:07 IST2026-04-14T20:07:07+5:302026-04-14T20:07:14+5:30

मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाही, असा निर्धार कुटुंबियांनी घेतला होता

6-year-old boy dies after being hit by tractor; Case registered against accused after being left at the police station with the body, incident in Indapur | ट्रॅक्टरच्या धडकेने ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मृतदेहासह ठाण मांडून बसल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, इंदापूरातील घटना

ट्रॅक्टरच्या धडकेने ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मृतदेहासह ठाण मांडून बसल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, इंदापूरातील घटना

इंदापूर /बावडा : मुरमाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत सहा वर्षांचा मुलगा मरण पावल्याची घटना शेटफळ हवेली येथे रविवारी (दि. १२) दुपारी दीड वाजता घडली. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवल्याशिवाय बालकावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा निर्धार करत, मुलाच्या नातेवाइकांनी मुलाच्या मृतदेहासह बावडा पोलिस दूरक्षेत्राच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन सुरु केले. रात्री सव्वादहा वाजता आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, मध्यरात्रीनंतर शोकाकुल वातावरणात त्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या मुलाचे नाव प्रणव नितीन चव्हाण (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) असे आहे. आरोपीचे नाव मदन काळे (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) असे आहे. फिर्यादीचे नाव नितीन बाळू चव्हाण (वय ३४, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) असे आहे. दुपारी दीडच्या सुमारास प्रणव आपल्या घरासमोरील उकिरड्याजवळ उभा राहून लघुशंका करत असताना शेटफळ हवेलीहून मुरुम भरून बावड्याकडे भरधाव वेगात चाललेल्या ट्रॅक्टरने प्रणवला धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला व ट्रॅक्टर ट्रेलरच्या मध्यभागी चिरडला गेला. ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता पुढे नेला. या अपघातात प्रणव जागीच मरण पावला. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृतदेहासह त्याचे कुटुंबीय बावडा पोलिस दूरक्षेत्राच्या कार्यालयात आले. प्रणवच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाही, असा निर्धार कुटुंबियांनी घेतला. रात्री सव्वादहा वाजता आरोपी असणाऱ्या ट्रॅक्टरचा मालक व चालक मदन काळे याच्यावर गुन्हा दाखल झाला.

Web Title : ट्रैक्टर से 6 वर्षीय बच्चे की मौत; विरोध के बाद मामला दर्ज

Web Summary : इंदापुर में ट्रैक्टर की टक्कर से छह वर्षीय बच्चे की मौत हो गई। परिवार के विरोध के बाद ड्राइवर के खिलाफ मामला दर्ज किया गया। आरोपी मदन काले गिरफ्तार।

Web Title : Tractor Kills 6-Year-Old; Case Filed After Protest in Indapur

Web Summary : A six-year-old boy died in Indapur after being hit by a tractor. Family protests led to a case being filed against the driver. Accused Madaan Kale arrested.