इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 08:23 IST2026-04-15T08:18:55+5:302026-04-15T08:23:25+5:30

Iran War News: अमेरिकेने इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई सुरू करत ‘समुद्री नाकेबंदी’ केली आहे. इराणची आर्थिक नाडी मानला जाणारा तेल व्यापार आणि आयात-निर्यात पूर्णपणे रोखण्यासाठी अमेरिकेने १० हजारांहून अधिक नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान तैनात केले आहेत.

Iran's dilemma from America; 10,000 soldiers deployed, not a single ship has escaped the US siege in 24 hours | इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही

इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही

तेहरान - अमेरिकेने इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई सुरू करत ‘समुद्री नाकेबंदी’ केली आहे. इराणची आर्थिक नाडी मानला जाणारा तेल व्यापार आणि आयात-निर्यात पूर्णपणे रोखण्यासाठी अमेरिकेने १० हजारांहून अधिक नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान तैनात केले आहेत. या कारवाईमुळे इराणची सागरी दळणवळण यंत्रणा कोलमडली असून, तणाव वाढला आहे.

अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, नाकेबंदी लागू झाल्याच्या पहिल्या २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे जाऊ शकले नाही. अमेरिकन नौदलाच्या इशाऱ्यानंतर ६ मालवाहू जहाजांनी आपला मार्ग बदलला आणि ओमानच्या आखातातून पुन्हा इराणच्या बंदरांकडे माघार घेतली. अमेरिकेच्या एक डझनहून अधिक युद्धनौका समुद्रात सज्ज असून, शंभराहून अधिक लढाऊ आणि पाहणी विमाने आकाशात गस्त घालत आहेत. या निर्णयाने आधीच कमकुवतयुद्धबंदी धोक्यात येईल, असा इशारा चीनने दिला.

मोदी-ट्रम्प दरम्यान पुन्हा द्विपक्षीय संबंधांवर चर्चा : भारत-अमेरिकेदरम्यान लवकरच ऊर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रात काही मोठे करार होत असून त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. यात होर्मुझचा विषयही चर्चेत आला. चर्चेच्या अखेरीस ट्रम्प यांनी मोदींना, आम्हा सर्वांना तुमच्याबद्दल खूप आदर आणि प्रेम असल्याचे सांगितले. 

चर्चेची दुसरी फेरी : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची दुसरी फेरी आगामी 'दोन दिवसांत' पार पडू शकते असे विधान केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच या फेरीचे यजमानपद भूषवण्याची शक्यता वर्तवली आहे. 
संरक्षण करार स्थगित : इटलीने इस्रायलशी असलेला संरक्षण करार स्थगित केला. आम्ही ज्या परिस्थितीतून जात आहोत, ती पाहता हा निर्णय घेणे आवश्यक आहे, असे इटलीच्या पंतप्रधान जाॅर्जिया मेलाेनी म्हणाल्या. 

Web Title : ईरान पर अमेरिकी शिकंजा: 10,000 सैनिक तैनात, व्यापार अवरुद्ध

Web Summary : अमेरिका ने ईरान के खिलाफ नौसैनिक नाकेबंदी शुरू की, तेल व्यापार रोकने के लिए 10,000 सैनिक तैनात। अमेरिकी युद्धपोतों की गश्त से ईरानी शिपिंग बाधित, जहाजों का मार्ग बदला। मोदी और ट्रम्प के बीच होर्मुज मुद्दे पर चर्चा, संभावित अमेरिका-ईरान वार्ता का संकेत।

Web Title : US Tightens Grip on Iran: 10,000 Troops Deployed, Trade Blocked

Web Summary : The US has initiated a naval blockade against Iran, deploying 10,000 troops to halt oil trade. Iranian shipping is disrupted as US warships patrol, forcing ships to reroute. Discussions between Modi and Trump included the Hormuz issue, while potential US-Iran talks are hinted at.