भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:30 IST2026-04-15T09:29:49+5:302026-04-15T09:30:10+5:30

'देवदास'नंतर शाहरुख-भन्साळी पुन्हा एकत्र?

Shah Rukh Khan and sanjay leela bhansali to work together after 24 years in talks for a project | भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान

भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान

'देवदास' हा शाहरुख खानचा सुपरहिट सिनेमा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्तम सिनेमांपैकी एक आहे. संजय लीला भन्साळींनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. भव्यदिव्य सेट, एकापेक्षा एक कॉस्च्युम्स, सुरेल गाणी, डान्स याचं विशेष कौतुक झालं. भन्साळींचा सिनेमा म्हटल्यावर या गोष्टी असणारच असा पॅटर्नच सेट झाला. शाहरुख खान आणि ऐश्वर्याची जोडी गाजली. माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफही भाव खाऊन गेले. आता भन्साळी आणि शाहरुखची जोडी पुन्हा येणार असल्याची चर्चा आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान तब्बल २४ वर्षांनंतर भन्साळींच्या सिनेमात दिसणार असल्याची शक्यता आहे. हा एक रोमँटिक सिनेमा आहे. बऱ्याच काळापासून दोघांमध्ये या प्रोजेक्टवर बोलणी सुरु आहेत. आता ही चर्चा अंतिम टप्प्यावर आली आहे. तसंच रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की शाहरुखला आता त्याच्या वयानुसारच भूमिका करायच्या आहेत. म्हणून भन्साळींच्या आगामी सिनेमात तो पन्नाशीच्या पुढील मॅच्योर व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 

काय असेल शाहरुख खानची भूमिका?

भन्साळींच्या रोमँटिक ड्रामामध्ये शाहरुख अशा व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल तो करिअरमध्ये एका कठीण वळणावरुन जात असतो. अशातच त्याची ओळख एका अशा महिलेशी होते जी स्वत:चं स्टार्टअप चालवत असते आणि मग दोघं कसे प्रेमात पडतात याची ती गोष्ट आहे.

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळींनी शाहरुखला एका वेगळ्या प्रोजेक्टसाठीही विचारणा केली होती मात्र त्यांच्यातील बोलणी पुढे जाऊ शकली नाही आणि नंतर शाहरुखने सिनेमाला नकार दिला. दरम्यान आता या नव्या प्रोजेक्टबद्दलही अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

Web Title : शाहरुख खान भंसाली के साथ रोमांटिक प्रोजेक्ट में फिर आ सकते हैं।

Web Summary : शाहरुख खान 24 साल बाद संजय लीला भंसाली के साथ एक रोमांटिक ड्रामा में काम कर सकते हैं। कथित तौर पर वह एक परिपक्व किरदार निभाएंगे जो अपने करियर के चौराहे पर है, और एक स्टार्टअप चलाने वाली महिला से प्यार कर बैठता है। आधिकारिक पुष्टि का इंतजार है।

Web Title : Shah Rukh Khan may reunite with Bhansali for romantic project.

Web Summary : Shah Rukh Khan might collaborate with Sanjay Leela Bhansali after 24 years for a romantic drama. He'll reportedly play a mature character facing a career crossroads, falling for a startup-running woman. Official confirmation is awaited.