कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:41 IST2026-04-15T09:38:59+5:302026-04-15T09:41:38+5:30

Sahar Sheikh News: ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षातून मुंब्र्यातील प्रभाग ३० मधून ती विजयी झाली. तेव्हा ‘कैसे हराया?’ या विधानाने ती चर्चेत आली होती. मात्र, सहर शेखने निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असून, आता तिच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण  झाली आहे.

How was a bogus certificate created? AIMIM corporator Sahar Sheikh misled government agencies | कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल

कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल

- महेश पवार
मुंबई - उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी युनूस इकबाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना-८ वापरून व अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविला. त्यांची मुलगी सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षातून मुंब्र्यातील प्रभाग ३० मधून ती विजयी झाली. तेव्हा ‘कैसे हराया?’ या विधानाने ती चर्चेत आली होती. मात्र, सहर शेखने निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असून, आता तिच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण  झाली आहे.

ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्धीकी फरहा सबाब अहमद यांनी युनूस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना-१० लागू असताना नमुना-८ वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळविला. त्याआधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी केली होती. ठाणे तहसीलदारांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १८ मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनूस गैरहजर राहिले. मात्र, सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायाप्रत व काही कागदपत्रे सादर केली. त्याच्या पडताळणीसाठी पुन्हा २३ मार्चला सुनावणी घेण्यात आली. यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असतानाही सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.

Web Title : एमआईएम पार्षद ने फर्जी जाति प्रमाण पत्र से सरकारी एजेंसियों को गुमराह किया

Web Summary : एमआईएम पार्षद सहर शेख पर अधिकारियों को गुमराह करके फर्जी जाति प्रमाण पत्र का उपयोग करने का आरोप है। उनके पिता ने गलत फॉर्म का उपयोग करके जाली प्रमाण पत्र प्राप्त किया, जिससे उनकी चुनावी जीत हुई। विसंगतियों और प्रमाण पत्र की वैधता पर सवालों के कारण जांच चल रही है, जिससे उनकी स्थिति खतरे में पड़ सकती है।

Web Title : MIM Corporator Faked Caste Certificate, Misleading Government Agencies: Report

Web Summary : MIM corporator Sahar Sheikh allegedly used a fake caste certificate obtained by misleading authorities. Her father secured a bogus certificate using incorrect forms, enabling her election victory. An inquiry is underway due to discrepancies and questions about her certificate's validity, potentially jeopardizing her position.