अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:55 IST2026-04-15T10:53:13+5:302026-04-15T10:55:34+5:30

या नोटमचं टायमिंग महत्त्वाचं होते, या संशयास्पद हालचालींमुळे भारतीय नौदलाने १३ एप्रिलला सतर्कता बाळगत INS ध्रुवला अरबी समुद्रात उतरवले.

India has deployed INS Dhruv into the Arabian Sea after Pakistan declared a 450km missile test zone near Karachi and Gwadar | अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका

अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका

नवी दिल्ली - भारताने अरबी समुद्रात एक मोठा धोरणात्मक फायदा मिळवला आहे. पाकिस्तान एका संशयित क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत होता आणि यासाठी त्यांनी नोटम (NOTAM) सुद्धा जारी केला होता, परंतु भारताने तो प्रयत्न हाणून पाडला आहे. मिसाइल ट्रॅकिंग सिस्टमनं सुसज्ज असलेल्या आपल्या युद्धनौकांचा ताफा तैनात करून भारताने अरबी समुद्रात पाकिस्तानच्या रणनीतीला मात दिली आहे. 

रिपोर्टनुसार, पाकिस्तान अरबी समुद्रात काही तरी कुरापती करणार होता, परंतु त्याआधीच भारतीय नौदलाने मिसाइल ट्रॅकिंग सिस्टमनं सज्ज असलेली देखरेख ठेवणारी युद्धनौका INS ध्रुव अरबी समुद्रात उतरवली. पाकिस्ताननं NOTAM जारी केला होता त्याशिवाय मेरिटाइम वॉर्निंगही प्रसिद्ध केली होती. पाकिस्तानने १४ आणि १५ एप्रिल रोजी कराची, ओरमारा, ग्वादर आणि सोनमियानीजवळील सागरी क्षेत्रात सुमारे ४१५ किलोमीटर ते ४५० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या मोठ्या प्रतिबंधित क्षेत्रासाठी सागरी इशारा जारी करण्यात आला. 

या नोटमचं टायमिंग महत्त्वाचं होते, या संशयास्पद हालचालींमुळे भारतीय नौदलाने १३ एप्रिलला सतर्कता बाळगत INS ध्रुवला अरबी समुद्रात उतरवले. भारताकडून हे पाऊल पाकिस्तानच्या घोषणेनंतर २४ तासाच्या आत उचलण्यात आले. जरी पाकिस्तानी लष्कराने NOTAM जारी करण्यामागील आपला हेतू उघड केला नसला तरी, पाकिस्तान एकतर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, लांब पल्ल्याची सागरी प्रणाली प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे किंवा एखाद्या सामरिक नौदल प्लॅटफॉर्मच्या क्षमतांचे मूल्यांकन करत आहे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दरम्यान, या प्रकरणी भारतीय किंवा पाकिस्तानी नौदलाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. भारताची INS ध्रुव युद्धनौका विशेषतः अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत क्षेपणास्त्र ट्रॅकिंग मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहे. ती अण्वस्त्रे देखील वाहून नेऊ शकते. आयएनएस ध्रुवच्या तैनातीमुळे पाकिस्तानने घोषित केलेल्या संवेदनशील क्षेत्रांवर पाळत ठेवणे शक्य होईल. जर पाकिस्तानने नवीन क्रूझ क्षेपणास्त्र, बॅलिस्टिक प्रणाली किंवा पाणबुडी प्रक्षेपित केली, तर आयएनएस ध्रुव भारतीय नौदलाला सर्व महत्त्वपूर्ण माहिती पुरवू शकेल.

Web Title : भारत ने अरब सागर में पाकिस्तान की नौसेना की चाल को नाकाम किया।

Web Summary : भारत ने अरब सागर में पाकिस्तान के संदिग्ध मिसाइल परीक्षण को विफल कर दिया। पाकिस्तान की समुद्री चेतावनी के 24 घंटों के भीतर आईएनएस ध्रुव को तैनात करके, भारत ने क्षेत्र की निगरानी की। विशेषज्ञों का अनुमान है कि पाकिस्तान ने मिसाइल लॉन्च या नौसेना का आकलन करने की योजना बनाई थी। कोई आधिकारिक बयान जारी नहीं किया गया।

Web Title : India Thwarted Pakistan's Naval Ambitions in Arabian Sea with Swift Deployment.

Web Summary : India strategically countered Pakistan's suspected missile test in the Arabian Sea. Deploying INS Dhruv within 24 hours of Pakistan's maritime warning, India monitored the area. Experts speculate Pakistan planned missile launches or naval assessments. No official statements were released.