मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:48 IST2026-04-15T07:46:47+5:302026-04-15T07:48:22+5:30

हरिद्वारमध्ये भक्तीचा महासंगम होणार असून अर्धकुंभ २०२७ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Haridwar Ardh Kumbh 2027 Schedule Announced for 10 Major Bathing Festivals and 3 Shahi Snans | मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक

मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक

Haridwar Ardh Kumbh Mela 2027: सनातन धर्मातील श्रद्धेचा महाकुंभ मानला जाणारा अर्धकुंभ मेळा २०२७ पुढील वर्षी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे रंगणार आहे. जानेवारी ते एप्रिल २०२७ या चार महिन्यांच्या कालावधीत हा भव्य सोहळा पार पडेल. मेळा प्रशासनाने नुकतीच या सोहळ्यातील प्रमुख १० स्नान पर्वणींची अधिकृत घोषणा केली असून, यात ३ विशेष अमृत (शाही) स्नानांचा समावेश आहे.

चार महिने चालणार भक्तीचा उत्सव

मेळा अधिकारी सोनिका सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी २०२७ (मकर संक्रांती) पासून या मेळ्याला सुरुवात होईल आणि २० एप्रिल २०२७ (चैत्र पौर्णिमा) रोजी सांगता होईल. या काळात देश-विदेशातून करोडो भाविक गंगा मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हरिद्वारमध्ये दाखल होतील.

तिथी / सणदिनांकस्नानाचे स्वरूप
मकर संक्रांती१४ जानेवारी २०२७पहिले प्रमुख स्नान
मौनी अमावस्या६ फेब्रुवारी २०२७दुसरे स्नान
वसंत पंचमी११ फेब्रुवारी २०२७तिसरे स्नान
माघ पौर्णिमा२० फेब्रुवारी २०२७चौथे स्नान
महाशिवरात्री६ मार्च २०२७पाचवे स्नान (पहिले अमृत स्नान)
फाल्गुन अमावस्या८ मार्च २०२७सहावे स्नान (दुसरे अमृत स्नान)
नव संवत्सर (गुढीपाडवा)७ एप्रिल २०२७सातवे स्नान
मेष संक्रांती१४ एप्रिल २०२७आठवे स्नान (तिसरे अमृत स्नान)
विशेष स्नान१५ एप्रिल २०२७नऊवे स्नान
चैत्र पौर्णिमा२० एप्रिल २०२७अंतिम स्नान (सांगता)

अर्धकुंभाचे पौराणिक महत्त्व

समुद्रमंथनातून जेव्हा अमृत कलश बाहेर आला, तेव्हा देव आणि दानव यांच्यात झालेल्या युद्धात अमृताचे थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. जिथे हे थेंब पडले, तिथे कुंभमेळा भरतो. दर ६ वर्षांनी अर्धकुंभ आणि दर १२ वर्षांनी पूर्ण कुंभ आयोजित केला जातो.

Web Title : हरिद्वार अर्ध कुंभ 2027: शाही स्नान की तिथियां घोषित।

Web Summary : हरिद्वार में जनवरी से अप्रैल 2027 तक अर्ध कुंभ मेला आयोजित किया जाएगा। मेला प्रशासन ने तीन विशेष अमृत (शाही) स्नान सहित दस प्रमुख स्नान तिथियों की घोषणा की है। मेला मकर संक्रांति से शुरू होकर चैत्र पूर्णिमा को समाप्त होगा।

Web Title : Haridwar Ardh Kumbh 2027: Dates for holy baths announced.

Web Summary : Haridwar will host the Ardh Kumbh Mela from January to April 2027. The fair administration has announced ten major bathing dates, including three special Amrit (Shahi) Snan. The mela commences on Makar Sankranti and concludes on Chaitra Purnima.