शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेत बुधवारी काॅपीची २१ प्रकरणे, दहावीच्या पेपरला एकही कॉपीची घटना नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:13 IST

दहावीच्या दाेन्ही पेपरसाठी एकही काॅपीचा प्रकार घडला नाही, त्याउलट बारावीत मात्र २१ काॅपी प्रकार समाेर आले आहेत

पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बुधवारी (दि. २५) सकाळच्या सत्रात बारावीचा ‘जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास’ या विषयाचा पेपर झाला. यावेळी काॅपीचे एकूण २१ प्रकार समाेर आले आहेत. इयत्ता दहावीची दाेन सत्रांत परीक्षा हाेऊनदेखील राज्यभरात एकही काॅपीची घटना घडली नाही. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली.

दहावीसाठी सकाळच्या सत्रात द्वितीय किंवा तृतीय भाषा या विषयाची, तर दुपारच्या सत्रात द्वितीय वा तृतीय भाषा (संयुक्त अभ्यासक्रम) या विषयाची परीक्षा पार पडली. यामध्ये दहावीच्या दाेन्ही पेपरसाठी एकही काॅपीचा प्रकार घडला नाही, त्याउलट बारावीत मात्र २१ काॅपी प्रकार समाेर आले आहेत.

बारावी परीक्षेत बुधवारी आढळलेल्या काॅपी प्रकारामध्ये पुणे विभागात ७, छत्रपती संभाजीनगर १०, लातूर २ आणि मुंबई, अमरावती या विभागांतील प्रत्येकी १, असे एकूण २१ प्रकरणे तपासात पुढे आली. नागपूर, काेल्हापूर, नाशिक आणि काेकण विभाग निरंक राहिले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, काेल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर आणि काेकण अशा विभागांमार्फत ही परीक्षा घेतली जात असून, दहावीत सर्व विभाग निरंक आहेत.

विभागीय मंडळनिहाय गैरमार्ग अवलंबलेल्यांची संख्या

विभाग - बारावी (जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास) - दहावी (द्वितीय वा तृतीय भाषा)

पुणे - ०७ - निरंक
नागपूर - निरंक - निरंक

छत्रपती संभाजीनगर - १० - निरंक
मुंबई - ०१ - निरंक

कोल्हापूर - निरंक - निरंक
अमरावती - ०१ - निरंक

नाशिक - निरंक - निरंक
लातूर - ०२ - निरंक

कोकण - निरंक - निरंक
एकूण - २१ - निरंक

English
हिंदी सारांश
Web Title : Class 12 Exam Sees 21 Copy Cases; Class 10, Zero

Web Summary : Maharashtra's Class 12 exams reported 21 cheating cases during Wednesday's Biology paper. In contrast, the Class 10 exams saw no instances of cheating across both sessions, according to the state education board. Pune, Chhatrapati Sambhajinagar, and Latur reported the most cases.
टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाssc examदहावीStudentविद्यार्थीEducationशिक्षणTeacherशिक्षक