शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

"देशाचे पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम"; बाळासाहेब थोरातांचा मोदींवर घणाघात

By मोरेश्वर येरम | Updated: January 16, 2021 14:58 IST

नागपुरात आज काँग्रेसच्यावतीने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं.

ठळक मुद्देनागपुरात केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचा मोर्चापेट्रोल दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक, बाळासाहेब थोरातांचा मोदींवर निशाणाथोरातांनी वाचला महाविकास आघाडी सरकारच्या कामांचा पाढा

नागपूरदेशाचे पंतप्रधान सध्या भांडवलदारांचे गुलाम झाले असून मूठभर श्रीमंतांच्या फायद्यासाठीच काम करत आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ते नागपुरात बोलत होते. 

नागपुरात आज काँग्रेसच्यावतीने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं. बाळासाहेब थोरात या मोर्चाचं नेतृत्व करत होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. "देशाचा शेतकरी आज दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करतोय. पण देशात्या पंतप्रधानांना त्याबाबत काहीच वाटत नाही. आपल्या लहान मुलाबाळांसोबत कडाक्याच्या थंडीत सलग ५२ दिवस आंदोलन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. देशाचे पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झाले आहेत आणि देशाच्या शेतकऱ्यांनाही गुलाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण काँग्रेस तसं होऊ देणार नाही", असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकारने केली शेतकऱ्यांना मदतशेतकरी कर्जमुक्तीच्या दिशेने महत्वाचं पाऊल राज्याच्या सरकारने टाकलं आणि १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणं हा आमचा हेतू आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. 

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्याच्या हातातली शेती जाणार आहे. मोठमोठे उद्योगपती कवडीमोल दरानं शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतील आणि त्याचा हवातसा साठा करतील. कोट्यवधी कमवतील यात सर्वसामान्य शेतकऱ्याचा काय फायदा होणार?, असा सवाल थोरात यांनी यावेळी उपस्थित केला. नव्या कृषी कायद्यांसाठी राज्यपातळीवर समितीकेंद्र लागू करु पाहत असलेल्या नव्या कृषी कायद्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आल्याचंही थोरात यांनी यावेळी सांगितलं. या समितीकडून शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाnagpurनागपूर