शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

पडुचेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं; नारायणसामींनी मोदी, हिंदी, बेदींवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 12:36 PM

congress government falls in puducherry : मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश, काँग्रेसचं सरकार कोसळलं

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश, काँग्रेसचं सरकार कोसळलंपुडुचेरी आणि देशातील जनता नक्कीच धडा शिकवेल, नारायणसामी यांचं वक्तव्य

congress government falls in puducherry : पुडुचेरीमध्येकाँग्रेसला मोठा झटका लागला आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. त्यानंतर पुडुचेरीतील सरकारल कोसळलं. पुडुचेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी उपराज्यपालांना आपला राजीनामा सोपवला. रविवारी दोन आमदारांनी आपला राजीनामा दिल्यानंतर पडुचेरीमध्ये राजकारण तापलं होतं.आज पुडुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपल्या समर्थक आमदारांसह विधानसभेतून वॉकआऊट केलं. त्यानंतर उपराज्यपालांची भेट घेत त्यांनी आपला राजीनामा सोपवला. "आम्ही द्रमुक आणि अपक्ष आमदारांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं. त्यानंतर आम्ही अनेक समस्यांचा सामनाही केला. आम्ही अन्य निवडणुकाही जिंकल्या. पुडुचेरीची जनता आमच्यावर विश्वास ठेवून आहे ये यातून स्पष्ट होतं," असं ते यापूर्वी म्हणाले. त्यांनी बोलताना पुडुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांच्यावरही निशाणा साधला. "किरण बेदी आणि केंद्र सरकारनं सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. जसे आमचे सर्व आमदार एकत्र आले आम्ही पाच वर्ष पूर्ण करण्यात यशस्वी झालो. केंद्र सरकारनं पडुचेरीच्या नागरिकांचा विश्वासघात केला आहे," असंही ते म्हणाले. "तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये आम्ही दोन भाषा प्रणालीचं पालन करतो. परंतु भाजपनं जबरदस्ती हिंदी लागू करण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी आपल्या पक्षाच्याप्रती प्रामाणिक राहिलं पाहिजे. राजीनामा देणारे आमदार लोकांचा सामना करू शकणार नाहीत. लोकं त्यांना संधीसाधू असं म्हणतील," असंही त्यांनी नमूद केलं. विरोधी पक्षाचे अधिक आमदारपुडुचेरीचे नवनियुक्त उपराज्यपाल तमिलिसाई सौदरराजन यांनी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार के लक्ष्मीनारायण आणि द्रमुखचे आमदार व्यंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या ११ झाली. तर विरोधीपक्षांचे सध्या १४ आमदार झाले.

टॅग्स :puducherry-pcपुडुचेरीcongressकाँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकार