Crime News : तीन वर्षांचा गैरप्रकार उघड ...! ७७ वर्षीय ज्येष्ठांचा पाणीचोरीविरोधात लढा; व्यावसायिकाला लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:11 IST2026-04-15T10:10:13+5:302026-04-15T10:11:07+5:30

तीन वर्षांचा गैरप्रकार उघड : दत्ता धामस्कर यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेला करावी लागली कारवाई 

Pimpri ChinchwadCrime News 77-year-old fights against water theft; Businessman fined Rs. 1 lakh | Crime News : तीन वर्षांचा गैरप्रकार उघड ...! ७७ वर्षीय ज्येष्ठांचा पाणीचोरीविरोधात लढा; व्यावसायिकाला लाखाचा दंड

Crime News : तीन वर्षांचा गैरप्रकार उघड ...! ७७ वर्षीय ज्येष्ठांचा पाणीचोरीविरोधात लढा; व्यावसायिकाला लाखाचा दंड

प्राधिकरण : प्राधिकरण परिसरात सुरू असलेल्या पाणीचोरीच्या प्रकारावर ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने थेट लढा उभारत महापालिका प्रशासनाला कारवाईस भाग पाडले. तब्बल तीन वर्षे सुरू असलेल्या या गैरप्रकाराचा भांडाफोड करत संबंधित व्यावसायिकावर १ लाख ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक दत्ता धामस्कर यांनी निवासी पाणी जोडणीतून सलून व्यवसायासाठी पाण्याचा बेकायदा वापर सुरू असल्याचे उघड केले. हा प्रकार त्यांनी वारंवार ‘अ’ प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला; मात्र सुरुवातीला प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले.

प्रशासनाच्या उदासीनतेला न जुमानता धामस्कर यांनी माहिती अधिकाराचा वापर करत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर महापालिकेला तपास करावा लागला. या तपासात मागील तीन वर्षांपासून पाणीचोरी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधित व्यावसायिकावर १ लाख ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे महापालिकेच्या उत्पन्नाला बसणारा मोठा फटका थांबवण्यात प्रशासनाला यश आले. 

पोलिस संरक्षणामुळे लढा कायम

दत्ता धामस्कर यांच्या या सातत्यपूर्ण लढ्याचे स्थानिक नागरिकांसह महापौर रवी लांडगे यांनीही कौतुक केले. तक्रार प्रक्रियेदरम्यान त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला; मात्र पोलिस संरक्षणामुळे त्यांनी हा लढा कायम ठेवला, असे नागरिकांकडून सांगण्यात आले.

Web Title : 77 वर्षीय बुजुर्ग ने उजागर की पानी की चोरी, व्यवसायी पर जुर्माना

Web Summary : प्राधिकरण में 77 वर्षीय नागरिक ने पानी की चोरी के खिलाफ लड़ाई लड़ी, जिसके परिणामस्वरूप एक स्थानीय व्यवसाय पर ₹1,00,300 का जुर्माना लगाया गया। दत्तात्रय धामस्कर के लगातार प्रयासों से, आरटीआई का उपयोग करके, तीन साल से चल रहे अवैध पानी के उपयोग का पर्दाफाश हुआ। शुरुआती प्रशासनिक लापरवाही और उत्पीड़न का सामना करने के बावजूद, उन्होंने पुलिस सुरक्षा के साथ दृढ़ता दिखाई।

Web Title : 77-Year-Old Exposes Water Theft, Business Fined Lakh Rupees

Web Summary : A 77-year-old citizen fought against water theft in Pradhikaran, leading to a fine of ₹1,00,300 for a local business. Dattatray Dhamaskar's persistent efforts, using RTI, exposed the three-year-long illegal water usage. Despite initial administrative negligence and facing harassment, he persevered with police protection.