Crime News : सांगवी - बोपोडी तीस कोटींचा पुलाबाबत व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:37 IST2026-04-21T15:36:07+5:302026-04-21T15:37:32+5:30

Crime News - सांगवी भागातील भ्रष्टाचाराबाबत बोलल्यामुळेच माझ्यावर हा खुनी हल्ला करण्यात आला असून, आरोपींना राजकीय पाठबळ दिले जात आहे.

pimpari-chinchwad Sangvi - Social activist beaten up for posting on WhatsApp group about Bopodi bridge worth Rs 30 crore | Crime News : सांगवी - बोपोडी तीस कोटींचा पुलाबाबत व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

Crime News : सांगवी - बोपोडी तीस कोटींचा पुलाबाबत व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

पिंपरी : तीस कोटींचा पूल आणि २२ कोटीचे सुशोभीकरण यामुळे वादात सापडलेल्या सांगवी - बोपोडी पुलाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला ५ जणांवर हल्ला केल्याची तक्रार झाली आहे. यावरून आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मारुतराव तनपुरे (वय ५९, रा. आनंदनगर, सांगवी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक नारायण शेगडे (वय २०) आणि अंकित कुमार उर्फ कल्लू राजेश मोरया (वय १९) याच्यावर आणि तीन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सांगवीतील माकन रुग्णालय चौकामध्ये तनपुरे हे दुचाकीवरून जात असताना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संशयितांनी त्यांना पाठलाग करून अडवले. त्यांच्यावर रॉडने हल्ला केला, मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आसपास सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन संशयितांनी अटक केली. अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

काय होते कारण

तनपुरे यांनी नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सांगवी येथील भाजपचे नगरसेवक आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या विरोधामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सांगवी परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुप निर्माण केला होता. त्या ग्रुपमध्ये तनपुरेही होते. पोस्टवरून कोणीतरी हल्ला केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

सांगवी भागातील भ्रष्टाचाराबाबत बोलल्यामुळेच माझ्यावर हा खुनी हल्ला करण्यात आला असून, आरोपींना राजकीय पाठबळ दिले जात आहे. प्रशांत शितोळे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, तनपुरे आमचे स्नेही आहेत. एकत्र काम केले आहे. त्यांना कुणीतरी फितविले आहे. या प्रकरणास चुकीचे वळण दिले जात आहे. त्यांना चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार करणार आहोत. त्यांचा शोध पोलिस घेतील.  -प्रशांत शितोळे (सत्तारूढ पक्षनेते)

Web Title : सांगवी पुल पर व्हाट्सएप पोस्ट के कारण सामाजिक कार्यकर्ता पर हमला।

Web Summary : सांगवी-बोपोडी पुल पर व्हाट्सएप पोस्ट करने पर एक सामाजिक कार्यकर्ता पर हमला किया गया। पुलिस ने दो संदिग्धों को गिरफ्तार किया और तीन नाबालिगों के खिलाफ आरोप दायर किए। कार्यकर्ता ने हमले के पीछे राजनीतिक मंशा का आरोप लगाया।

Web Title : Social activist assaulted for WhatsApp post on Sangvi bridge.

Web Summary : A social activist was attacked for posting about the controversial Sangvi-Bopodi bridge on WhatsApp. Police have arrested two suspects and filed charges against three minors. The activist alleges political motives behind the assault.