पिंपरीतील रमाबाईनगर परिसरातून सोमवारी अपहरण झालेल्या सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी पिंपरीतील एच़ ए़ मैदानावर सापडला. या मुलीवर अपहरणकर्त्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. ...
मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. यात भाजपाने ठाकूरसाई, तुंग व केवरे या तीन ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळविला. ...
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. यामुळे चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना काहिसा दिलासा मिळाला. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. ...
स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या १८० झाली आहे. एका ३५ वर्षीय महिलेचा मंगळवारी (दि. २५) मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या मृतांचा आकडा २४ झाला आहे. ...
झोपडपट्ट्यांमधील अवैध नळजोड नियमित करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता महापालिकेने अनामत रक्कम, दंड आणि पाणीपट्टी रक्कम कमी करण्याचे धोरण आखले आहे. ...
अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डच्या गोपनीय महितीचा उपयोग करून अज्ञात भामट्याने आमदारांचे बंधू आणि बांधकाम व्यावसायिक शंकर पांडुरंग जगताप (वय ४४, रा. पिंपळे गुरव) यांची चार लाख २६ हजार ९४७ रुपयांची फसवणूक केली. ...
काळेभोर लांब केस हे महिलांचे मुख्य आकर्षण, पण हे केस जेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी उपयोगी ठरत असल्याचे समजल्यावर ते कापून दान करण्याचे धाडस चिंचवडमधील तेरा वर्षीय आदिती जैन हिने केले आहे. ...
शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. ...