'पुढच्या वेळी गोळी मॉलवर नाही, थेट डोक्यात मारू', पिंपरी-चिंचवडमध्ये बिष्णोई गँगचे खंडणीसाठी व्यावसायिकांना टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:27 IST2026-05-16T18:25:44+5:302026-05-16T18:27:16+5:30

आणखी एक फर्निचरवाल्याला लक्ष्य करत ‘‘तू तयार रहा, तुलाही मारणार,’’ अशी धमकी सोशल मीडियावरून त्यांनी दिली आहे

'Next time, I won't shoot at the mall, I'll shoot straight at the head', Bishnoi gang targets businessmen for extortion in Pimpri-Chinchwad | 'पुढच्या वेळी गोळी मॉलवर नाही, थेट डोक्यात मारू', पिंपरी-चिंचवडमध्ये बिष्णोई गँगचे खंडणीसाठी व्यावसायिकांना टार्गेट

'पुढच्या वेळी गोळी मॉलवर नाही, थेट डोक्यात मारू', पिंपरी-चिंचवडमध्ये बिष्णोई गँगचे खंडणीसाठी व्यावसायिकांना टार्गेट

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. खंडणीसाठी जिवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुनावळे येथील एजे फर्निचर मॉलवरील गोळीबाराच्या घटनेनंतर या टोळीचे शहरातील वाढते नेटवर्क पुन्हा चर्चेत आले आहे.  

पुनावळे परिसरातील एजे फर्निचर मॉलवर दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी बेधडक गोळीबार केला. काही सेकंदांतच गोळ्या झाडून संशयित पसार झाले. शुक्रवारी (दि. १५ मे) रात्री ९:१० वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. 

‘हा गोळीबार म्हणजे छोटासा ट्रेलर...’

गोळीबाराची जबाबदारी स्वीकारताना स्वतःला लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य सांगणाऱ्या शुभम लोणकर याने सोशल मीडियावर थेट धमकी दिली आहे. ‘‘एमडी ड्रग्ज तस्करी आणि हवाला व्यवहार करणाऱ्या अशोक नयन यांच्या एजे फर्निचर मॉलवर आम्ही गोळीबार केला. त्याला यापूर्वी समजावले होते. पण त्याला पैशांची घमेंड असल्याने हा छोटासा ट्रेलर दाखवला आहे. पुढच्यावेळी गोळी मॉलवर नाही, थेट डोक्यात मारू,’’ असा इशारा दिला आहे. याचबरोबर वीर फर्निचरवाला मुकेश सहराना यालाही लक्ष्य करत ‘‘तू तयार रहा, तुलाही मारणार,’’ अशी धमकी सोशल मीडियावरून दिली आहे.   

व्यावसायिक, व्यापाऱ्यांमध्ये दहशत

सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, केवळ खंडणीसाठी नव्हे तर शहरात स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारी नेटवर्क विस्तारण्यासाठी अशा घटना घडविल्या जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियाचा वापर करून उघडपणे जबाबदारी स्वीकारणे आणि धमक्या देणे, हा संघटित गुन्हेगारीचा नवा ट्रेंड म्हणून पाहिले जात आहे.    

बिष्णोई गँगचे ‘स्लीपर नेटवर्क’ सक्रिय?

यापूर्वीही पिंपरी-चिंचवड शहरात बिष्णोई गँगचे नाव समोर आले होते. जानेवारी महिन्यात शहरातील एका व्यावसायिकाकडे पाच कोटींची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन व्यापाऱ्यांना धमक्या देत गोळीबाराची घटना समोर आली. त्यामुळे या टोळीचे शहरातील ‘स्लीपर नेटवर्क’ सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title : बिश्नोई गिरोह ने पिंपरी-चिंचवड के व्यापारियों को धमकी दी, गोलीबारी की।

Web Summary : लॉरेंस बिश्नोई गिरोह ने पिंपरी-चिंचवड के व्यापारियों को उगाही के लिए धमकाया। एजे फर्नीचर मॉल में गोलीबारी; गिरोह के सदस्य ने जिम्मेदारी ली, मांगें पूरी न होने पर और हिंसा की धमकी दी। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Bishnoi gang threatens Pimpri-Chinchwad businessmen for extortion, open fire.

Web Summary : Lawrence Bishnoi gang threatens Pimpri-Chinchwad businessmen for extortion. AJ Furniture mall was shot at; a gang member claimed responsibility, threatening more violence if demands aren't met. Police are investigating.