शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकानं केला बलात्कार; दुसऱ्याकडून शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानं महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 20:18 IST

एकाला अटक : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देतोंडावर दगडाने मारून मृतदेह झाडीत दिला फेकून

पिंपरी : दोन जणांनी महिलेला दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर नेले. तेथे एकाने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, महिलेने त्याला नकार दिल्याने त्याने ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून तिचा खून केला. तसेच तोंडावर दगडाने मारून मृतदेह झाडीत टाकला. पुणे - मुंबई महामार्गावर देहूरोड नजिकच्या घोरावडेश्वर डोंगरावर सोमवारी (दि. २०) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

तुकाराम कोंडीबा दडस (वय २६, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड, मूळ रा. टाकेवाडी, पोस्ट तोंडले, ता. माण, जि. सातारा) आणि अक्षय कारंडे (रा. लोणंद, सातारा), अशी आरोपींची नावेत आहेत. आरोपी दडस याला पोलिसांनीअटक केली. पीडित १९ वर्षीय मयत महिलेच्या पतीने या प्रकरणी तळेगाव - दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  

पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम दडस व अक्षय कारंडे हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. मयत महिला ही गृहिणी होती. तर तिचा पती मजुरीची कामे करतो. तसेच आरोपीही मजुरीची कामे करतात. मयत महिलेचे एका वर्षपूर्वी लग्न झाले होते. 

आरोपींनी पीडित महिलेला रविवारी (दि. १९) सकाळी दहाच्या सुमारास दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर नेले. तेथे गेल्यावर आरोपी अक्षय याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तुकाराम दडस याने पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपी तुकाराम दडस याने ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून तिचा खून केला. तसेच ओळख पटू नये म्हणून तोंडावर दगडाने मारून मृतदेह झाडीत टाकला. पोलिसांनी आरोपी तुकाराम दडस याला अटक केली असून आरोपी अक्षय कारंडे फरार आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिलाDeathमृत्यू