२ कोटींच्या खंडणीसाठी फर्निचर माॅलवर झाडल्या ६ गोळ्या; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:01 IST2026-05-16T18:00:55+5:302026-05-16T18:01:03+5:30

दुकानाच्या मालकाला एका मोबाइल क्रमांकावरून फोन करून २ कोटींच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती

6 bullets fired at furniture mall for extortion of Rs 2 crore; Lawrence Bishnoi gang claims responsibility for firing | २ कोटींच्या खंडणीसाठी फर्निचर माॅलवर झाडल्या ६ गोळ्या; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी

२ कोटींच्या खंडणीसाठी फर्निचर माॅलवर झाडल्या ६ गोळ्या; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा एकदा खंडणीसाठी गोळीबार केल्याची घटना समोर आली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करत दहशत निर्माण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यानंतर सोशल मीडियावरून धमकीची पोस्ट व्हायरल झाली आहे. औंध-रावेत बीआरटी मार्गावर पुनावळे येथे शुक्रवारी (दि. १५ मे) रात्री ९:१० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

जगदीश भेराराम बिष्णोई (वय ३४, रा. पुनावळे, ता. मुळशी, जि. पुणे; मूळ रा. झोटाडा, ता. साचोर, जि. जालोर) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका मोबाइल क्रमांकावरून फोन काॅल करणारा व्यक्ती आणि गोळीबार करणारे दोन अनोळखी अशा तीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश बिष्णोई यांचा भागीदार अशोककुमार बिष्णोई यांना एका मोबाइल क्रमांकावरून एका संशयिताने फोन केला. दोन कोटी रुपयांची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. परंतु अशोककुमार यांनी खंडणी दिली नाही. 

दरम्यान, शुक्रवारी (दि. १५) रात्री फिर्यादी जगदीश बिष्णोई हे त्यांच्या एजे फर्निचर माॅलच्या बाहेर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी फर्निचर माॅलच्या फलकावर तसेच काचेवर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर दोघे संशयित दुचाकीवरून पसार झाले. अशोककुमार यांनी खंडणी दिली नाही म्हणून फोनवरून खंडणी मागणाऱ्या संशयिताच्या सांगण्यावरून हा गोळीबार करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद आहे.  

संशयितांनी केलेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून ‘फॉरेन्सिक टीम’लाही पाचारण केले होते. गोळीबार करणाऱ्या दोघांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता आणि त्यामागील ‘कनेक्शन’ही तपासले जात आहे. 

संशयितांच्या शोधासाठी स्थानिक पोलिस तसेच गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील पोस्ट तसेच फोन काॅलचेही तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. - गणेश इंगवले, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title : वसूली के लिए फर्नीचर मॉल पर फायरिंग; बिश्नोई गिरोह ने जिम्मेदारी ली

Web Summary : पिंपरी-चिंचवड: 2 करोड़ रुपये की वसूली के लिए एक फर्नीचर मॉल पर फायरिंग की गई। लॉरेंस बिश्नोई गिरोह ने जिम्मेदारी ली। बाइक पर सवार दो संदिग्धों ने सीसीटीवी में कैद होकर फायरिंग की। पुलिस धमकी की जांच कर रही है और संदिग्धों की तलाश कर रही है।

Web Title : Firing at Furniture Mall for Extortion; Bishnoi Gang Claims Responsibility

Web Summary : Pimpri-Chinchwad: A furniture mall was fired upon for ₹2 crore extortion. The Lawrence Bishnoi gang claimed responsibility. Two suspects on a bike opened fire, captured on CCTV. Police are investigating the threat and searching for the suspects.