पैठणीपेक्षा स्वस्त पण लूक एकदम रॉयल! जरी बॉर्डर, नाजूक बुट्टी सुंदर इरकल साडीची कमाल - पाहा मनमोहक डिझाईन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2026 20:05 IST2026-05-16T20:00:15+5:302026-05-16T20:05:01+5:30

pure silk butta irkal saree : traditional irkal silk saree : silk butti saree designs : प्युअर सिल्क बुट्टी इरकल साडीचे एकापेक्षा एक सुंदर रंग, साडी नेसून दिसाल सुंदर...

भारतीय पारंपरिक साड्यांमध्ये 'इरकल' साडीला एक मोठं मानाचं स्थान आहे. खास करून प्युअर सिल्क बुट्टी इरकल साडी ही तिच्या आकर्षक डिझाईन, हलक्या वजनाचे फॅब्रिक आणि रॉयल लूकमुळे महिलांच्या विशेष पसंतीस उतरते.

या साडीवरील नाजूक बुट्टी वर्क, सुंदर बॉर्डर आणि सिल्कचा उठावदार पोत कोणत्याही महिलेला एलिगंट आणि क्लासी लूक देतो. लग्नसमारंभ, सणवार किंवा खास कार्यक्रमांसाठी ही साडी परफेक्ट मानली जाते. पारंपरिकतेसोबत आधुनिक स्टाईलचा सुंदर मिलाफ असलेली प्युअर सिल्क बुट्टी इरकल साडी सध्या फॅशन विश्वात पुन्हा ट्रेंडिंग आणि प्रत्येक महिलेची खास आवडीची झाली आहे.

फॅशनचे शेकडो ट्रेंड्स आले आणि गेले, तरीही प्रत्येकीला मनापासून आवडणारी एकच साडी आहे, ती म्हणजे इरकल. लग्नसराई असो, सण-समारंभ असो किंवा घरातील मोठे कार्य, इरकल साडी नेसल्याशिवाय स्त्रीचे सौंदर्य अपूर्णच वाटते.

१. अस्सल प्युअर सिल्क कापडामुळे ही साडी अंगावर अत्यंत हलकी, मऊ आणि नेसण्यास अतिशय कम्फर्टेबल वाटते. आपल्याकडील सणांमध्ये पैठणीइतकाच राजेशाही आणि श्रीमंत लूक मिळवण्यासाठी 'प्युअर सिल्क इरकल' हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

२. संपूर्ण साडीवर विणलेली जरीची, रेशमी नाजूक 'बुट्टी' या साडीच्या सौंदर्याला एक वेगळाच डिझायनर लूक देते. नाजूक बुट्टी डिझाईनमुळे साडीचा साधेपणातही उठावदार लूक दिसून येतो.

३. इरकल साडीची खरी ओळख तिच्या काठामध्ये असते. प्युअर सिल्क प्रकारात हे काठ अधिक उठावदार आणि चमकदार दिसतात. या साड्यांमध्ये आता साध्या धाग्यांऐवजी सोन्या-चांदीच्या रंगात चमकणाऱ्या जरी बुट्ट्यांचा वापर केला जातो त्यामुळे या साड्या अधिक खुलून दिसतात.

४. सध्याच्या नववधूंना देखील केळवण किंवा लग्नानंतरच्या पुजेसाठी प्युअर सिल्क बुट्टी इरकल साडीचा लूक प्रचंड आवडतोय.

५. या साडीसोबत पारंपरिक खणाचा ब्लाऊज किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा कोपरापर्यंत बाह्या असलेला ब्लाऊज अप्रतिम दिसतो.

६. या साडीवर अस्सल महाराष्ट्रीयन दागिने जसे की चिंचपेटी, ठुशी, कोल्हापुरी साज आणि मोत्याची नथ एक परफेक्ट रॉयल लूक देतात.

७. पोपटी-लाल, जांभळा- पांढरा आणि पिवळा-हिरवा हे प्युअर सिल्क इरकलमधील सर्वात लोकप्रिय रंग आहेत. यासोबतच, प्युअर सिल्क प्रकारात येणारे रॉयल ब्लू, मोरपिंकी, बॉटल ग्रीन आणि डार्क मरून हे रंग फोटोंमध्ये अतिशय ब्राईट आणि सुंदर दिसतात.

८. भरजरी, वजनाला जड साड्या सांभाळणे कठीण जाते, पण प्युअर सिल्क इरकल वजनाने अत्यंत हलकी असल्याने दिवसभर सहज कॅरी करता येते.

९. आजकालच्या तरुणी या पारंपरिक साडीला वेस्टर्न बेल्ट किंवा आधुनिक हेअरस्टाईल सोबत फ्युजन लूक देऊन ही साडी अत्यंत सुंदर पद्धतीने नेसतात. पारंपरिक साडीला मॉडर्न लूक देण्यासाठी आजकालच्या तरुणी यावर बोट नेक, हाय नेक किंवा स्लीव्हलेस ब्लाऊज घालणे पसंत करतात.

१०. या साडीचे फॅब्रिक इतके चांगले आणि उत्तम असते की योग्य काळजी घेतल्यास या साडीची चमक वर्षानुवर्षे जशीच्या तशीच राहते.