PHOTOS| संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थानासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 11:39 AM2023-06-10T11:39:07+5:302023-06-10T11:53:09+5:30

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा निमित्त शनिवारी दुपारी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. (सर्व फोटो- राजेंद्र काळोखे)

मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती

पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती

पालखीला व पालखी रथाला देखील फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे.

महिला वारकरी फुगडी खेळण्यात दंग

पालखीसोबत चालणारा मानाचा माई दिंडी बाबुळगावकरांचा अश्व चिखली मुक्कामावून सकाळी सात वाजता मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा करण्यासाठी आला होता आश्वाससोबत पालखी सोहळ्यात चालणारी माई दिंडी देखील प्रदक्षिणा करण्यासाठी आली होती

मंदिराला बाहेरूनही फुलांची सजावट करण्यात आली होती.

आबाल वृद्धांनी इंद्रायणी नदीकाठी अंघोळीसाठी मोठी गर्दी केली होती

परिसरात रांगोळी काढण्यात आली होती

स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी वेगळा पेहराव

श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका येथील सुनील घोडेकर सराफ यांच्या कुटुंबीयांनी चकाकी दिली