coronavirus : किम जोंगने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दिला अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:34 PM2020-04-08T17:34:35+5:302020-04-08T18:08:17+5:30

कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात वेगाने होत आहे. जगातील अनेक बडे देश कोरोनाशी झुंजत असताना उत्तर कोरियामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात वेगाने होत आहे. जगातील अनेक बडे देश कोरोनाशी झुंजत असताना उत्तर कोरियामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

मात्र असे असले तरी उत्तर कोरियामध्ये नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सूचना केल्या जात आहेत.

हुकूमशहा किम जोंग ऊन ची सत्ता असलेल्या उत्तर कोरियामध्ये नागरिकांना कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कोरियन नागरिकांना देण्यात आला आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पारंपरिक भोजन घेण्याचा तसेच आहारात लसूण, कांदा अशा पदार्थांचा अधिक समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यापासून जगभरात कोरोनाच्या फैलावाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 14 लाख रुग्ण सापडले आहेत. तसेच सुमारे 80 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर कोरियन जनतेचा बाहेरील जगाशी फारसा संबंध येत नाही. तसेच चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे उत्तर कोरिया कोरोनाच्या प्रकोपापासून बचावला आहे.