जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 13:26 IST2026-05-17T13:25:06+5:302026-05-17T13:26:07+5:30

FBI Director Kash Patel News: अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Jet, $50,000 suit and girlfriend..., FBI Director Kash Patel in the middle of controversy | जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  

जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  

अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काश पटेल यांची आलिशान जीवनशैली आणि सरकारी साधनसामुग्रीच्या गैरवापरामुळे हा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एफबीआयचे डायरेक्टर कुठल्यातरी अधिकृत  दौऱ्यावर होते. मात्र यादरम्यान, त्यांनी त्यांची गर्लफ्रेंड अॅलेक्सिस विल्किंस हिच्यासोबत काही खाजगी वेळही घालवला. 

यासंदर्भात समोर  आलेल्या वृत्तानुसार १० मे रोजी काश पटेल  हे त्यांची २७ वर्षीय गर्लफ्रेंड अॅलेक्सिस विल्किंस हिच्यासोबत एफबीआच्या गल्फस्ट्रीम-व्ही या विमानातून वॉशिंग्टन  येथून फिलाडेल्फिया येथे गेले होते. तिथे त्यांनी प्रसिद्ध म्युझिक स्टार जॉर्ज  स्ट्रेट आणि ख्रिस स्टेपलटन  यांची कॉन्सर्ट पाहिली. या दोघांनीही सुमारे ३५ हजार ते  ५० हजार डॉलर किंमत असलेल्या प्रायव्हेट सूटमधून शोचा आनंद घेतला. 

मात्र यामुळे एफबीआयचे  फ्लाईट क्रू आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत ड्युटीवर तैनात राहावे लागले. रिपोर्ट्सनुसार कॉन्सर्ट संपल्यानंतर  रात्री ११ वाजेपर्यंत अधिकारी पटेल आणि त्यांची गर्लफ्रेंड कधी बाहेर येते याची वाट पाहत होते. त्यामुळे ओव्हरटाईमचा खर्च वाढला. मात्र आता हे प्रकरण चर्चेत आल्यापासून एफबीआयकडून हे आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

Web Title : FBI निदेशक काश पटेल विलासितापूर्ण जीवनशैली पर विवादों में

Web Summary : FBI निदेशक काश पटेल संसाधनों के कथित दुरुपयोग के लिए जांच के दायरे में हैं। उन्होंने कथित तौर पर अपनी गर्लफ्रेंड एलेक्सिस विल्किंस के साथ फिलाडेल्फिया में एक संगीत कार्यक्रम में भाग लेने के लिए FBI जेट का इस्तेमाल किया। निजी सुइट की कीमत $50,000 थी, जिससे आलोचना हुई और FBI कर्मचारियों के लिए ओवरटाइम लागत के बारे में चिंताएं बढ़ गईं।

Web Title : FBI Director Kash Patel Faces Controversy Over Luxury Lifestyle

Web Summary : FBI Director Kash Patel is under scrutiny for alleged misuse of resources. He reportedly used an FBI jet with his girlfriend, Alexis Wilkins, to attend a concert in Philadelphia. The cost of the private suite was $50,000, sparking criticism and raising concerns about overtime costs for FBI staff.