NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 13:32 IST2026-05-17T13:31:23+5:302026-05-17T13:32:47+5:30

NEET paper leak case: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने कोर्टासमोर सादर केलेल्या धक्कादायक माहितीनंतर विद्यार्थ्यांसह पालकांच्याही पायाखालची जमीन सरकली.

Who is the mastermind of NEET paper leak? CBI presents new evidence in court, students and parents are shocked | NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!

NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने कोर्टासमोर सादर केलेल्या धक्कादायक माहितीनंतर विद्यार्थ्यांसह पालकांच्याही पायाखालची जमीन सरकली. आरोपी आणि पेपर सेटिंग समितीची सदस्य मनीषा मनीषा मांढरेचा थेट मूळ प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. त्यामुळे तिनेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करत प्रश्नपत्रिकेचे पुढे वितरण केल्याचा सीबीआयचा दावा केला असून पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कठोर परिश्रम करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सीबीआयने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे ही वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे भाषांतर करण्याचे काम करत होती. त्यामुळे ती मूळ प्रश्नपत्रिकेच्या थेट सबंध होता. याच अधिकाराचा गैरवापर करत तिने संपूर्ण यंत्रणेचा विश्वासघात केला. मनीषा मांढरे ही या रॅकेटमधील केवळ एक सामान्य सदस्य नसून, संपूर्ण कटकारस्थानातील अत्यंत महत्त्वाची कडी होती. मनीषा मांढरे आणि पीव्ही कुलकर्णी यांनी एकमेकांशी संगनमत करून प्रश्नपत्रिका पुढे पोहोचवण्याचे काम केले. मनीषा मांधरेने तिच्याकडे असलेली मूळ प्रश्नपत्रिका शुभम नावाच्या दुसऱ्या आरोपीकडे दिली. त्यानंतर या प्रश्नपत्रिकेचे पुढे वितरण करण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी मनीषा मांढरे हिला न्यायालयाने १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या देशभरात सुरू आहे. विविध राज्यांमध्ये एकाच वेळी छापे आणि चौकशी मोहीम राबवली जात असून, या रॅकेटचे जाळे अनेक शहरांपर्यंत पसरले असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि भाषांतराची जबाबदारी असलेल्या व्यक्तींनीच गैरप्रकारात सहभाग घेतल्याचा आरोप समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पुढील १४ दिवसांच्या सीबीआय कोठडीत या संपूर्ण रॅकेटमागील सूत्रधार कोण, प्रश्नपत्रिका कुठपर्यंत पोहोचली आणि किती जणांचा या कटात सहभाग होता, याबाबत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title : NEET पेपर लीक: सीबीआई ने मास्टरमाइंड का खुलासा किया, छात्र और माता-पिता हैरान!

Web Summary : सीबीआई ने मनीषा मांढरे की NEET पेपर लीक में संलिप्तता का खुलासा किया, जिन्होंने मूल पेपर तक पहुंच बनाई और वितरित किया। जांच जारी है, जिसमें प्रश्न पत्र तैयार करने वालों और अनुवादकों सहित एक व्यापक रैकेट का पर्दाफाश हुआ है, जिससे परीक्षा की विश्वसनीयता और छात्रों का भविष्य खतरे में है।

Web Title : NEET Paper Leak: CBI Uncovers Mastermind, Students and Parents Shocked!

Web Summary : CBI reveals Manisha Mandhare's involvement in NEET paper leak, accessing and distributing the original paper. Investigations continue, exposing a widespread racket involving question paper setters and translators, jeopardizing exam credibility and students' futures.