बोंबला : प्रशिक्षकाच्या मुलीला सर्वांसमोर स्टार खेळाडूनं केलं Kiss अन्...

Published: May 15, 2021 02:03 PM2021-05-15T14:03:27+5:302021-05-15T14:05:57+5:30

स्टार फुटबॉलपटू डेल अली आणि मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांची कन्या मारिया यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 20 वर्षी मारिया आणि 25 वर्षी डेल लंडमधील एका रुफटॉप बारमध्ये अनेकांसमोर एकमेकांना Kiss करत होते. ( FOOTBALL star Dele Alli has been spotted snogging the daughter of Manchester City boss Pep Guardiola)

इंग्लिश प्रीमिअर लीगमधील स्पूर क्लब व इंग्लंड संघाचा मध्यरक्षक डेल अली याची यंदाच्या पर्वातील कामगिरी साजेशी झालेली नाही. पण, मैदानाबाहेरील कृतीमुळे तो आता चर्चेत आला आहे. बारमध्ये अनेक जण उपस्थित होते, परंतु त्या कुणाचीही पर्वा न करता या दोघांनी एकमेकांना किस करण्यास सुरूवात केली अन् सर्व अवाक् झाले.

क्लाऊड 9 बारमध्ये ही दोघं जवळपास तासभर एकमेकांशी गप्पा मारत होती आणि अचानक ते एकमेकांच्या जवळ आले. अलीनं सफेद रंगाचा टी शर्ट घातला होता आणि हिरवी बेसबॉल कॅपही परिधान केली होती. मारियानंही सफेद हूडी घातली होती.

डेल व मारिया यांची मागील महिन्यात भेट झाली. रविवारी स्पूर क्लबला EPLच्या सामन्यात लिड्स युनायटेडकडून 3-1 असा पराभव पत्करावा लागला. पराभव झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी डेल व मारिया हे एकत्र दिसले. डेलच्या मित्रांच्या माहितीनुसार त्यानं आधीची प्रेयसी रुबी हिच्याशी नातं तोडलं आहे.