रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या स्टॉकची कमाल, लोकांना केलं मालामाल; 1 आठवड्यांत दिला 45% परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:09 IST2026-01-20T17:02:18+5:302026-01-20T17:09:29+5:30

या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ₹१८१.३० आहे. कंपनीचे मार्केट कॅप ₹२,५२९ कोटी एवढे आहे...

शेअर बाजारात सातत्याने घसरण दिसत असतानाही रेखा झुनझुनवालाची गुंतवणूक असलेला शेअर आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करताना दिसत आहे. बाजार स्टाईल रिटेलचा शेअर्स आज ६ टक्क्यांपेक्षाही अधिकने वधारून बीएसईवर ₹३४४.९५ या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.

खरे तर, २३ ऑक्टोबर २०२५ नंर हा शेअर या पातळीवर पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. बाजार स्टाईल रिटेलचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹३९१.९० एवढा आहे.

कंपनीचा शेअर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी या पातळीवर होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मंगळवार, २० जानेवारी रोजी, रेखा झुनझुनवालाचा शेअर बीएसईवर ४.२९ टक्क्यांनी वाढून ₹३३९ वर बंद झाला.

गेल्या आठवड्यात, रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या शेअरने ४५ टक्के एवढा परतावा दिला आहे, तर या काळात बीएसई सेन्सेक्स १.२ टक्क्यांनी घसरला आहे.

रेखा झुनझुनवालाची कंपनीतील हिस्सेदारी किती? - डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचा ३.४ टक्के हिस्सा आहे. त्यांच्याकडे कंपनीचे तब्बल २.५३ लाख शेअर्स आहेत. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत, या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्या शेअरहोल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ४५.७१ टक्के आहे आणि जनतेचा हिस्सा ५४.२९ टक्के आहे. गेल्या दोन तिमाहींत यात कसलाही बदल झालेला नाही. यापूर्वी, जून २०२५ च्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, प्रवर्तकांचा हिस्सा ४५.५७ टक्के होता आणि जनतेचा हिस्सा ५४.४३ टक्के होता.

गेल्या वर्षभरात, बाजार स्टाईल रिटेलच्या शेअरच्या किमतीत १०.४६ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर या कालावधीत सेन्सेक्स निर्देशांक ६.६३ टक्के वाढला आहे. बाजार स्टाईल रिटेलचा ५२ आठवड्यांचा नीचांक ₹१८१.३० आहे. कंपनीचे मार्केट कॅप ₹२,५२९ कोटी एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)