शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 09:50 IST

गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आयशाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असताना सोशल मीडियावर अनेक चुकीचा संदेश देणारे मेसेज शेअर केले जात आहे. एखाद्या मेसेजबाबत कोणतीही पडताळणी न करता तो तसाच दुसऱ्यांना पाठवला जातो. सध्या असाच एक मेसेज आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डॉक्टर आयशाचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंडिग होत आहे. डॉक्टर आयशाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र ती कोरोनाला हरवू शकली नाही आणि ईदच्या दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. जगाचा निरोप घेताना ती लोकांसाठी एक संदेश आणि हास्य सोडून गेली, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. 

17 जुलै रोजी आयशाचा वाढदिवस होता. तिने आपला वाढदिवस खूप आनंदात साजरा केला. त्याचा एक व्हिडीओ आयशा नावाच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती वाढदिवस साजरा करीत असल्याचे दिसत आहे. तिच्या त्या फोटोमध्ये ती अत्यंत आनंदात दिसत आहे. ट्विटरवर तिने एक संदेशही लिहिला आहे. त्यात आयशा म्हणाली की, हाय फेंड्स..मी कोरोनाशी नाही लढू शकत. आज कोणत्याहीक्षणी मी व्हेंटिलेटरवर जाऊ शकते. मला आठवणीत ठेवा. तुमच्यासाठी माझी स्माइल...तुमच्या मैत्रीसाठी खूप आभार...तुमची खूप आठवण येईल..सुरक्षित राहा...या जीवघेण्या व्हायरसला गांभीर्याने घ्या, असं म्हणत आयशाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र या व्हिडिओ आणि फोटोमागील सत्य आता समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आयशाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तसेच ट्विटरवर आशयाचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. मात्र आयशाचे फोटो आणि व्हिडिओ दोघेही बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. 

डॉक्टर अमरिंदर नावाच्या एका ट्विटर यूजरने डॉक्टर आयशा आताच डॉक्टर झाली होती.17 जुलैला तिने वाढदिवस साजरा केला. ईदच्या दिवशी आपल्या सुंदर स्माइलने तिने जगाचा निरोप घेतला, असं म्हटलं होतं. मात्र अमरिंदर यांनी हे ट्विट आता हटवलं आहे. तसेच आयशाच्या नावाचं ट्विटरवर असलेलं अकाऊंट देखील डिलिट करण्यात आलं आहे.

 निधी रजधान या ट्विटर यूजरने देखील आयशाच्या मृत्यू संदर्भात ट्विट केले होते. मात्र काही वेळेनंतर तिने स्वत: हे ट्विट हटवून ही बातमी खोटी असल्याचं जाहीर केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdocterडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतTwitterट्विटर