शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:14 IST

याला म्हणतात मत चोरी... देशात केव्हा झाली पहिली मत चोरी...? इंदिरा गांधींचा उल्लेख करत काय म्हणाले अमित शाह...?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी SIR संदर्भाती चर्चेदरम्यान 'मत चोरी'च्या (Vote Theft) मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर थेट निशाणा साधला. गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधक मत चोरीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. दरम्यान आज शाह यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचे नाव घेत मत चोरी संदर्भात भाष्य केले.

याला म्हणतात मत चोरी - शाह म्हणाले मत चोरीचे तीन प्रकार असतात, पहिला प्रकार म्हणजे, पात्रत नसतानाही मतदार बनणे. दुसरे म्हणजे, अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकणे आणि तिसरे म्हणजे, मतांच्या विरोधात पद मिळवणे. हे तिनही प्रकार मत चोरीच्या कक्षेत येतात.

देशात केव्हा झाली पहिली मत चोरी? -शाह म्हणाले, जेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान निवडण्याची वेळ आली, तेव्हा पहिली मतचोरी झाली. तेव्हा देशात जेवढे प्रांत होते, तेवढेच काँग्रेसचे प्रांताध्यक्ष होते. त्यांच्या मतांवरून देशाचा पहिला पंतप्रधान ठरणार होता. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना २८ मते मिळाली, तर जवाहरलाल नेहरू यांना केवळ दोन मते मिळाली. मात्र, तरीही पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बनले. यानंतर कांँग्रेस खासदारांनी सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली.

इंदिरा गांधींचा उल्लेख करत काय म्हणाले अमित शाह? -शाह पुढे म्हणाले, दुसऱ्या प्रकारची मत चोरी म्हणजे, 'अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकणे'. श्रीमती इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडून आल्यानंतर, श्री राजनारायण यांनी निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हणत, अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर, न्यायालयाने इंदिरा गांधी यांनी योग्य पद्धतीने निवडणूक जिंकली नाही, असे म्हणत ती निवडणूकच रद्द केली. ही देखील खूप मोठी मत चोरी होती. ही मत चोरी झाकण्यासाठी नंतर, पंतप्रधानांविरुद्ध कोणताही खटला चालवला जाऊ शकत नाही, असा कायदा संसदेत आणला गेला. अर्थात, इंदिरा गांधी यांनी स्वतःलाच कायदेशीर संरक्षण देण्याचे काम केले, असेही शाह म्हणाले.

पात्रता नसतानाही मतदार होणे -शाह म्हणाले, मत चोरीचा तिसरा प्रकार म्हणजे, 'पात्र नसतानाही मतदार होणे'. या संदर्भात बोलताना शाह यांनी एका न्यायालयीन वादाचा उल्लेख केला. ते म्हणाले, सोनिया गांधी या भारताच्या नागरिक बनण्यापूर्वीच मतदार बनल्या होत्या. असे प्रकरण दिल्लीच्या एका दिवाणी न्यायालयात, दाखल झाले आहे. यासंदर्भात आता त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nehru, Indira, Sonia: Amit Shah Directly Accuses Them of Vote Theft

Web Summary : Amit Shah accused Nehru, Indira Gandhi, and Sonia Gandhi of vote theft in Lok Sabha. He cited examples like Nehru becoming PM despite fewer votes, Indira Gandhi's election nullification, and Sonia Gandhi allegedly registering as a voter before citizenship.
टॅग्स :Amit Shahअमित शाहSonia Gandhiसोनिया गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाcongressकाँग्रेस