शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 09:05 IST

दर महिन्याला अशा किमान गंभीर केसेस येतात ज्यामध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. लहान खडे औषधांद्वारे बाहेर काढले जातात, परंतु मोठ्या खड्यांसाठी शस्त्रक्रिया करावी लागते. 

नवी दिल्ली - सहसा मोठ्या माणसांमध्ये आढळणारी किडनी स्टोनची समस्या आता लहान मुलांमध्येही वेगाने वाढताना दिसत असून, ही बाब वैद्यकीय तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दर आठवड्याला किडनी स्टोनचे नवीन रुग्ण दाखल होत आहेत. 

विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे अशा केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. वेळीच तपासणी, योग्य मूल्यमापन आणि जीवनशैलीत बदल करून ही समस्या टाळणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते, ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण सर्वाधिक आढळत आहे. यामध्ये किडनीसह पित्ताशय आणि लघवीच्या पिशवीतील खड्यांचाही समावेश आहे. दर महिन्याला अशा किमान गंभीर केसेस येतात ज्यामध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. लहान खडे औषधांद्वारे बाहेर काढले जातात, परंतु मोठ्या खड्यांसाठी शस्त्रक्रिया करावी लागते. 

मुख्य कारणे व खबरदारी मुलांमध्ये किडनी स्टोन होण्यामागे चुकीचा आहार, डिहायड्रेशन, आनुवंशिकता आणि बदलती जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत. उन्हाळ्यात पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडते आणि खडे तयार होण्याची शक्यता वाढते. याव्यतिरिक्त आहारात मिठाचे जास्त प्रमाण आणि जंक फूडचे अतिसेवन यामुळे हा धोका अधिक बळावतो. ज्या कुटुंबांमध्ये आधीच किडनी स्टोनचा इतिहास आहे, त्यांनी मुलांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पालकांसाठी सल्ला किडनी स्टोनची लक्षणे बऱ्याचदा सामान्य आजारासारखी वाटतात, त्यामुळे पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. पोटदुखी आणि चिडचिडेपणा, लघवी करताना त्रास होणे, थंडी वाजून जोरात ताप येणे किंवा सतत उलट्या होणे ही स्टोनची प्रमुख लक्षणे असू शकतात. बालरोग तज्ज्ञांनी आवाहन केले आहे की, कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. सोनोग्राफी आणि युरिन टेस्टद्वारे या आजाराचे निदान होऊ शकते. मुलांच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, त्यांना जंक फूडपासून दूर ठेवा आणि भरपूर पाणी पिण्याची सवय लावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kidney Stones Increasingly Affecting Young Children Aged 4-8 Years

Web Summary : Kidney stones are increasingly common in children aged 4-8, often due to dehydration, diet, and genetics. Symptoms include stomach pain and painful urination. Doctors advise parents to ensure adequate hydration, limit junk food and salt intake, and seek prompt medical attention for any concerning symptoms.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स