शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 05:56 IST

वंचितचा दावा : फडणवीसांचा इन्कार पण राऊत म्हणाले, ‘तेच’ सांगतील 

मुंबई - उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी ‘वर्षा’ बंगल्यावर गेले होते आणि त्यांंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, असा दावा केला गेल्याने शनिवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले. 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या हँडलवर या भेटीचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर चर्चेला उधाण आले. विधान परिषदेच्या १० जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील की नाही, याबाबत उत्सुकता आहे. ठाकरे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार)ने आधीच पाठिंबा दिला आहे. ठाकरे उमेदवार असले तर एकूणच निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना फडणवीस-ठाकरे यांच्यातील कथित भेटीचे वृत्त आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘ऑपरेशन टायगर’द्वारे उद्धवसेनेचे खासदार गळाला लावणार असल्याच्या बातम्यामुळे चर्चेला उधान आले आहे.

भेट झाली नाही : मुख्यमंत्रीमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, उद्धव ठाकरे यांना मला भेटायचे असेल वा आमची भेट व्हायची असेल तर ती लपूनछपून करण्याची गरज नाही. लपवून भेटण्यासारखा कोणता विषयदेखील नाही. अशी कोणतीही भेट झालेली नाही. जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा खोटारड्या हँडलना नोटीस बजावली जाईल.  

तेव्हा होती भाजपची बैठक बुधवारी रात्री भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे फडणवीस - ठाकरे भेटीचे वृत्त निखालस खोटे असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला.

संजय राऊत यांनी सस्पेन्स वाढवलाफडणवीस यांनी जसा स्पष्ट शब्दांत या भेटीचा इन्कार केला तसा इन्कार उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केला नाही. ते म्हणाले की, त्या दोघांचे फोनवर बोलणे झाले वा प्रत्यक्ष भेट झाली का? याबाबत ते दोघेच सांगू शकतात. मला त्याबाबत काही माहिती असेल तर मी का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत, त्यावर आतापासूनच पाणी का फिरवायचे? असे म्हणत राऊत यांनी सस्पेन्स वाढवला. 

सगळे संपर्कात - संजय शिरसाट‘ऑपरेशन टायगर’ सांगून होणार नाही, पण सगळे आमच्या संपर्कात आहेत, असे सामाजिक न्यायमंत्री व शिंदेसेनेचे नेते  शिरसाट यांनी पत्रकारांना सांगितले.ते म्हणाले की, ‘ऑपरेशन टायगर’ होणार हे आम्ही नाकारत नाही. पण त्याबाबत योग्य निर्णय कधी घ्यायचा ते शिंदेच ठरवतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray-Fadnavis Meeting? Political circles abuzz with claims, suspense, and Operation Tiger.

Web Summary : Claims of a Thackeray-Fadnavis meeting at 'Varsha' sparked political buzz, which Fadnavis denied. While Raut added to the suspense, Shirsat hinted at 'Operation Tiger', fueling speculation.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा