शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 19:03 IST

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा इतिहासावरुन वाद पेटला आहे. 

Dhirendra Shastri Shivaji Maharaj Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना सत्ता सांभाळण्याची विनंती केली होती, अशा आशयाचे विधान बागेश्वर धामचे धीरेद्र कृष्ण शास्त्री यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी घणाघाती टीका केली. 

आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. पंढरपूर वारीतील डोक्यावर विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती डोक्यावर घेतलेल्या वारकरी महिलेचा फोटो आणि धीरेंद्र शास्त्रींचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. 

मिटकरी म्हणाले, 'भोंदू हिंदी कथाकार'

अमोल मिटकरी म्हणाले की, "नामाचे सामर्थ्य न कळे ब्रह्मादिका | वेडावली देखा वेदशास्त्रे || साधीभोळी असली महाराष्ट्रातील मराठी कीर्तनकार व वारकरी संत परंपरा या उत्तर भारतीय भोंदू हिंदी कथाकारांपेक्षा उच्च कोटीची आहे."

वारकरी संप्रदायासाठी धोक्याची घंटा

आमदार मिटकरींनी पुढे म्हटले आहे की, "एकीकडे 'पाया पडे जन एकमेका' हे तत्त्वज्ञान प्रमाण मानणारा महाराष्ट्र, तर दुसरीकडे विठ्ठलाचे नामस्मरण प्रमाण न मानणारे उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसविले जात असतील; तर महाराष्ट्रातील मराठी जनांच्या वारकरी सांप्रदायासाठीही धोक्याची घंटा आहे. उत्तर भारतीय भोंदू हिंदी कथाकारांवर महाराष्ट्रात बंदी घालावी", अशी मागणी करत आमदार अमोल मिटकरींनी " वारकरी वाचवा, महाराष्ट्र संत परंपरा वाचवा", असे आवाहनही केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान, धीरेंद्र शास्त्री नेमके काय बोलले?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केले, ज्यामुळे वादाला तोंड फुटले.  

"छत्रपती शिवाजी महाराज युद्धे करून थकले. शिवाजी महाराज समर्थ रामदासांकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हा मुकूट आणि सत्ता तुम्ही सांभाळा, असे शिवाजी महाराज समर्थ रामदासांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले, ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते", या धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या विधानाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा इतिहासाबद्दलच्या वादाला तोंड फुटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amol Mitkari slams Dhirendra Shastri over Shivaji Maharaj statement.

Web Summary : Amol Mitkari criticizes Dhirendra Shastri's controversial statement about Shivaji Maharaj and Ramdas Swami. Mitkari calls for a ban on such speakers, emphasizing the threat to Maharashtra's Warkari tradition and saintly heritage.
टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीbageshwar dhamबागेश्वर धामShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज