IMD monsoon forecast 2026: एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टने दिली आहे. यावर्षी मान्सून कधीपर्यंत भारतात दाखल होईल याबद्दलचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सूनचे भारतात आगमन होण्याची शक्यता आहे.
ECMWF अर्थात युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होऊ शकते. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये २७ ते २९ मे दरम्यान भारतात मान्सून दाखल झाला होता. यावर्षीही मे च्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दक्षिण भारतात दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नैऋत्य मौसमी वारे सर्वात आधी भारतात अंदमान निकोबार बेटावर येतात. त्यानंतर केरळात दाखल होतात. अंदाजानुसार, अंदमान निकोबार बेटावर मान्सून १८ ते २५ मे यादरम्यान दाखल होऊ शकतो. २५ मे ते १ जून या कालावधी मान्सून पश्चिम आणि उत्तरेच्या दिशेने सरकू शकतो.
पुढील काही आठवडे पारा आणखी वाढणार
महाराष्ट्रासह उत्तर आणि पूर्व भारतातील तापमान वाढले आहे. अनेक भागांमध्ये तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असणार असून, भारतीय हवामान विभागाने तापमान वाढवण्याचा इशारा दिला आहे.
Web Summary : Good news! Monsoon 2026 may arrive in India by late May, according to ECMWF. Andaman & Nicobar Islands could see monsoon as early as May 18-25. Heatwave conditions persist across India for now.
Web Summary : अच्छी खबर! ईसीएमडब्ल्यूएफ के अनुसार, मानसून 2026 मई के अंत तक भारत में आ सकता है। अंडमान और निकोबार द्वीप समूह में मानसून 18-25 मई तक आ सकता है। फिलहाल भारत में लू की स्थिति बनी हुई है।