By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 17:00 IST
1 / 10सकाळी जेव्हा तुम्ही घरून ऑफिससाठी निघता, तेव्हा तुमचा चेहरा फ्रेश असतो, केस नीट सेट असतात आणि तुमचा लूक अगदी परफेक्ट असतो. मात्र ऑफिसला पोहोचल्यानंतर काही तासांतच त्वचा निस्तेज आणि केस चिकट दिसू लागतात. सोशल मीडियावर या बदलाला आता 'ऑफिस एअर थेअरी' असं नाव दिलं जात आहे. 2 / 10ऑफिसमधील एसीयुक्त वातावरणच त्वचा आणि केसांच्या या अवस्थेला जबाबदार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत, ऑफिसमधील चिल्ड एसीमुळे खरोखरच केस आणि त्वचा खराब होते का आणि यावर तज्ज्ञ काय म्हणतात, ते जाणून घेऊया.3 / 10हा ट्रेंड सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झाला आहे. यानुसार, सकाळी तयार होऊन बाहेर पडल्यानंतर दुपारपर्यंत त्वचा कोरडी होऊ लागते, केस चपटे (Flat) आणि तेलकट दिसू लागतात आणि संपूर्ण लूक फिका पडतो. अनेक युजर्सनी याचा संबंध ऑफिसमधील एअर कंडिशनिंग वातावरणाशी जोडला आहे.4 / 10तज्ज्ञांच्या मते, लोकांची ही समस्या पूर्णपणे चुकीची नाही, परंतु याला केवळ 'टॉक्सिक ऑफिस एअर' म्हणणं योग्य ठरणार नाही. तज्ज्ञांनुसार, एसी असलेल्या ऑफिसमध्ये आर्द्रता कमी असते, ज्यामुळे त्वचेतील पाणी वेगाने बाहेर पडतं. या प्रक्रियेला 'ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस' म्हटलं जातं. यामुळे त्वचा कोरडी आणि ओढल्यासारखी वाटते. 5 / 10त्वचेचा नैसर्गिक अडथळा कमकुवत होतो आणि संवेदनशीलता वाढते. केसांच्या बाबतीत स्काल्प कोरडा पडल्यामुळे शरीर जास्त तेल तयार करू लागतं, ज्यामुळे केस तेलकट आणि चपटे झालेले दिसतात.6 / 10तज्ज्ञ सांगतात की, केवळ ऑफिसमधील वातावरणच नाही, तर आपल्या रोजच्या सवयी देखील त्वचा आणि केस निर्जीव होण्यास मोठी भूमिका बजावतात. 7 / 10बाहेरील उष्णता, धूळ आणि घाम, त्यानंतर अचानक एसीमध्ये येणं, शहरातील प्रदूषण, दिवसभराचा थकवा आणि काळानुसार त्वचेत होणारे नैसर्गिक बदल या सर्वांचा एकत्रित परिणाम त्वचा आणि केसांवर दिसून येतो.8 / 10सतत एसीमध्ये राहिल्याने त्वचेतील ओलावा कमी होऊन खाज आणि कोरडेपणा वाढू शकतो. याशिवाय काही लोकांना डोकेदुखी, थकवा आणि श्वासाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. थंड आणि कोरडी हवा शरीराला डिहायड्रेट करते, ज्यामुळे चेहरा अधिक निस्तेज दिसू लागतो.9 / 10तज्ज्ञांच्या मते, काही सवयी लावून घेतल्यास या समस्येपासून वाचता येतं. बाहेरून आल्यानंतर चेहरा नीट स्वच्छ करा. मॉइश्चरायझर आणि हायड्रेटिंग उत्पादनांचा वापर करा.10 / 10दिवसभर पुरेसं पाणी प्या. सनस्क्रीनचा वापर करा. केस गरजेपेक्षा जास्त वेळा धुवू नका. त्वचेसाठी 'फेस मिस्ट' किंवा 'गुलाब पाण्याचा' वापर करा. उन्हाळ्यात केसांची नीट काळजी घ्या.