अरविंद केजरीवाल यांच्या नव्या निवासस्थानावरून दिल्लीमध्ये राजकारण तापलं आहे. भाजपा नेते प्रवेश वर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोंवर आम आदमी पार्टीने (AAP) जोरदार पलटवार केला असून हे फोटो 'पूर्णपणे खोटे' असल्याचा दावा केला आहे.
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी प्रवेश वर्मा यांच्यावर टीका करताना म्हटलं की, "प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांच्या घराचे जे फोटो प्रसिद्ध केले आहेत, ते पूर्णपणे खोटे आहेत. मी आव्हान देतो की, रेखा गुप्ता, एलजी महोदय आणि प्रवेश वर्मा यांनी आपलं घरं जनतेसाठी खुलं करावं. अरविंद केजरीवाल देखील आपलं घर जनतेसाठी उघडतील, मग कोणाचं घर किती आलिशान आहे हे जनतेला आपोआपच समजेल."
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि 'आप'च्या आमदार आतिशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, "प्रवेश वर्मा यांनी जारी केलेले सर्व फोटो खोटे आहेत. ते केजरीवाल यांच्या घराचे फोटो नाहीत. कोणाचं घर किती भव्य आहे हे ठरवण्यासाठी रेखा गुप्ता आणि एलजी साहेबांनी आपलं घरं खुलं करावं आणि केजरीवालही आपलं घर उघडतील. जनता स्वतःच काय ते ठरवेल."
आतिशी यांनी पुढे टोला लगावत म्हटलं की, हे फोटो केजरीवाल यांच्या घराचे नसून 'Pinterest' वरून डाऊनलोड केलेले आहेत! त्या म्हणाल्या, "भाजपावर अशी वेळ आली आहे की, जेव्हा केजरीवाल यांच्या विरोधात काहीच मिळत नाही, तेव्हा इंटरनेटवरून उचललेल्या फोटोंच्या आधारे खोटे दावे केले जात आहेत. प्रवेश वर्मा यापेक्षा तर तुम्ही AI चा वापर करायला हवा होता, म्हणजे तुमची चोरी इतक्या लवकर पकडली गेली नसती."
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
प्रवेश वर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन दावा केला होता की, केजरीवाल यांचा नवा बंगला अत्यंत भव्य आणि आलिशान आहे. काही फोटो प्रसिद्ध करून त्यांनी या बंगल्याचा उल्लेख 'शीशमहल-२' असा केला होता. "केजरीवाल यांनी सांगावं की या नव्या बंगल्यावर किती पैसा खर्च केला आहे आणि हा पैसा कोणाचा आहे?" असंही म्हटलं आहे.
Web Summary : AAP refuted BJP's claims about Arvind Kejriwal's new residence, calling shared photos 'completely false.' AAP leaders challenged BJP to open their homes for comparison, accusing them of using Pinterest images.
Web Summary : आप ने अरविंद केजरीवाल के नए आवास पर भाजपा के दावों का खंडन किया, साझा तस्वीरों को 'पूरी तरह झूठा' बताया। आप नेताओं ने भाजपा को तुलना के लिए अपने घर खोलने की चुनौती दी, और उन पर Pinterest छवियों का उपयोग करने का आरोप लगाया।