Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:40 IST

इथूनच सगळी सुरुवात झाली...,सुप्रिया पिळगावकरांचे फोटो पाहिलेत का?

मराठीतील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी.  दोघांनी 'अशीही बनवा बनवी', 'आयत्या घरात घरोबा',  'नवरा माझा नवसाचा', 'आम्ही सातपुते' असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले. दोघांना श्रिया ही एकुलती एक लेक आहे. आज श्रिया ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुप्रिया पिळगावकर यांनी काही फोटो पोस्ट करत लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांनी त्यांचा प्रेग्नंसीवेळचा फोटोही शेअर केला आहे.

श्रिया पिळगावकर ही आई सुप्रिया यांची लाडकी लेक आहे. सुप्रिया पिळगावकर अनेकदा सोशल मीडियावर श्रियाचे फोटो शेअर करत असतात. तिच्या यशाचं कौतुक करत असतात. आज लेकीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्या श्रियाला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. यासोबत त्यांनी कॅप्शन देत लिहिले, 'बेबी अँड द मदर'...हॅपी बर्थडे माय डार्लिंग'.

दुसरा त्यांनी श्रिया वेळी प्रेग्नंट असतानाचा फोटो शेअर केला आहे. यात त्यांचा बॉयकट दिसत असून त्यांनी फिक्या रंगाची साडी नेसली आहे. तर दुसरी महिला त्यांचं औक्षण करत आहे. यासोबत त्यांनी लिहिले, 'इथूनच सगळी सुरुवात झाली'...त्याकाळी प्रेग्नंसी फोटो असे असायचे.'

तिसरा फोटो खूप गोड आहे. यामध्ये मायलेकी पारंपरिक लूकमध्ये आहेत. सुप्रिया पिळगावकर कौतुकाने श्रियाचं गळ्यातलं नीट करताना दिसत आहेत. 'मी आणि माझं प्रतिबिंब' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. 

सुप्रिया पिळगावकर यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहतेही श्रियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. श्रिया लवकरच आगामी 'मिर्झापूर: द मूव्ही'मध्ये दिसणार आहे. तिच्या गाजलेल्या 'मिर्झापूर' सीरिजवरच हा सिनेमा आधारित आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Supriya Pilgaonkar shares pregnancy photo, reminisces on daughter Shriya's birthday.

Web Summary : Supriya Pilgaonkar wished her daughter Shriya a happy 37th birthday by sharing nostalgic photos, including a picture from her pregnancy. The photos went viral, with fans sending birthday wishes to Shriya, who will soon appear in 'Mirzapur: The Movie'.
टॅग्स :सुप्रिया पिळगांवकरश्रिया पिळगावकरमराठी अभिनेताप्रेग्नंसी