शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:50 IST

Sanjay Raut News: बकासूराने पुन्हा जन्म घेतला आहे, तो भाजपा झाला आहे. भाजपाने भारताला नरक बनवले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: महाभारतात बकासूर नावाचा राक्षस होता, त्यांचे पोट कधीही भरत नसे, तीच अवस्था आता भाजपाची झालेली आहे. बकासूराने पुन्हा जन्म घेतला आहे, तो भाजपा झाला आहे. ट्रम्प म्हणाले होते की, नरक झाला आहे, भाजपाने भारताला नरक बनवले आहे. नरक असलेल्या पक्षात हे खासदार गेले आहे, हे त्यांच्या लक्षात येईल, या शब्दांत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोला केला.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आप आमदी पक्षाला खूप मोठा राजकीय धक्का बसला. आप खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असून, पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली. आमच्यावर प्रयत्न झाले, पण आम्ही मात्र घाबरलो नाही. मला अटक केली, पार्टी सोडा, परंतु, पार्टी सोडली नाही. आम्ही रस्त्यावर लोक आहे आमचे काय वाकडे करणार. हे लोक देशात घाण पसरवत आहे. भाजपाचे टंम्पिंग ग्राऊंड झाले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

ईडीचे छापे पडले आणि राजकीय भूकंप झाला

भाजपा निर्लज्ज झाली आहे. तिने लाज सोडली आहे. राघव चड्ढासारखे काही लोक माझेही मित्र होते. कालपर्यंत राघव चड्ढा हे भाजपाला गुंडांचा पक्ष म्हणत होते. संजय मित्तल आणि संजय पाठक आणि इतरही खासदारांची भाषाही अशीच होती. आता हे सर्व लोक होलसेलमध्ये गुंडांच्या पक्षात गेले. आपने संजय मित्तल यांना राघव चड्ढा यांच्याऐवजी राज्यसभेत पक्षाचा उपनेता केले, त्याने मला धक्का बसला. तेव्हा मित्तल आनंदी होते. अचानक त्यांच्या काही संस्थांवर ईडीची कारवाई झाली. ईडीचे छापे पडले आणि राजकीय भूकंप झाला, असा दावा संजय राऊतांनी केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे दु:खी आहे, सुनावणी होत नाही, संविधाची हत्या झाली तरी सुनावणी होत नाही. निवडणुक आयोग आणि न्यायालयाडून न्यायाची अपेक्षा नाही. साडेचार वर्षे झाली तर सुनावणी होत नाही, तुम्ही असे कोणते काम करत आहात, हे आम्हालाही कळू द्या, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut Slams BJP Over AAP Split, Recalls Trump's 'Hell' Remark

Web Summary : Sanjay Raut criticizes BJP, likening it to a 'monster' and recalling Trump's 'hell' remark about India. He alleges BJP is corrupting the nation, accusing them of engineering a split in AAP after ED raids. Raut also expressed disappointment with the judiciary's delay in Uddhav Thackeray's case.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaghav Chadhaराघव चड्ढाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा