Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:40 IST

प्रस्ताव आरोग्य समितीच्या बैठकीत मंजूर; अभिप्रायासाठी आयुक्तांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: सुमारे १००  वर्षांपासून  मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरात नावलौकिक असणारे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालय आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’ या नावाने ओळखले जाणार आहे. मात्र, नव्या नावातील आद्याक्षरे (लघुरूप) लक्षात घेता, रुग्णालय ‘केईएम’ याच नावाने संबोधले जाईल असेच दिसते.

 नामांतराचा प्रस्ताव आज आरोग्य समितीच्या बैठकीत मंजूर झाला असून पुढील अभिप्रायासाठी तो आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. १९२६ साली इंग्रजांच्या राजवटीत किंग एडवर्ड यांच्या स्मरणार्थ  किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय बांधण्यात आले. कालांतराने ते केईएम नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र, स्वदेशी संकल्पनेतून समृद्ध वारसा पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक संस्थांची ब्रिजिशकालीन नावे गुलामगिरीची आठवण करून देतात. हे लक्षात घेऊन केईएमच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

स्वदेशी संकल्पनेतून समृद्ध वारसा पुनर्स्थापित 

भारत सध्या ‘स्वदेशी’ या प्रेरणादायी संकल्पनेतून आपला समृद्ध वारसा पुनर्स्थापित करत आहे. आजही अनेक सार्वजनिक संस्थांची नावे ब्रिटिशकालीन किंवा वसाहतवादी काळातील आहेत, जी गुलामगिरीची आठवण करून देतात. आपली संस्कृती, मूल्ये आणि गौरवशाली इतिहासाचे जतन करण्यासाठी या संस्थांना ऐतिहासिक व्यक्तींची नावे देणे आवश्यक आहे. भारतीय इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले हे नवीन नाव भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला आहे.

नामांतरासाठी लोढा यांचा पुढाकार

स्वदेशी वारसा जपण्यासाठी आणि वसाहतवादी मानसिकतेच्या खुणा पुसून टाकण्यासाठी  ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (के. ई. एम.) रुग्णालयाचे नाव ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करावे, असे पत्र मुंबई पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षांना पाठवले होते, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकमतला दिली. हा विषय आरोग्य समितीच्या आगामी सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्याची विनंती त्यांनी केली होती. या संदर्भातील प्रस्ताव आज आरोग्य समितीच्या बैठकीत मांडण्यात आला, त्यास समितीने मंजुरी दिली. आता हा प्रस्ताव अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai's KEM Hospital to be Renamed 'Kaushalyashreshth Eklavya Memorial'

Web Summary : Mumbai's renowned KEM Hospital is proposed to be renamed 'Kaushalyashreshth Eklavya Memorial Hospital'. The proposal, aimed at decolonizing names, has been approved by the Health Committee and awaits the Commissioner's opinion. Despite the new name, it will likely remain KEM.
टॅग्स :केईएम रुग्णालयमुंबई