Join us
Daily Top 2Weekly Top 5

“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांच्या चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:20 IST

MNS Sandeep Deshpande News: किती वर्ष प्रेमाने सांगायचे, १९६० पासून प्रेमानेच सांगत आहोत. जबरदस्ती कराल तर याचा उद्रेक संपूर्ण मुंबईभर होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

MNS Sandeep Deshpande News: आम्हाला बघायचे आहे की, मुंबई बंद करण्याची ताकद भैय्यांमध्ये आहे का? मराठी बऱ्याच लोकांना येते, शशांक राव यांना अडचण काय आहे. आम्हालाच अटक करतात, मात्र संजय निरुपम यांना सूट दिली जाते. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. आज आनंद दिघे असते तर संजय निरुपम यांच्या कानाखाली मारली असती. आता आनंद दिघे नाहीत, एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी तरी ते काम करावे, ही अपेक्षा आहे, या शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दहिसर येथे झालेल्या राड्यावरून संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधला.

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष सुरू असून, दहिसरमध्ये शिंदेसेना व मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांच्यात घोषणाबाजी झाली; पण, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. वाद इतका चिघळला की, संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा काढण्यात आली. यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना संजय निरुपम यांच्यावर हल्लाबोल केला. 

पोलीस संजय निरुपम यांना का पाठिंबा देतात, माहिती नाही

पोलिस बायस आहेत, त्यात वाद नाही. मराठी पोलीस भैय्या संजय निरुपम यांना का सपोर्ट करत आहेत, ते माहिती नाही. एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत. ते सांगतात की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आहे. मग, मराठी मुलांना जेलमध्ये टाकत संजय निरुपम यांना सपोर्ट करणारे कुठले सरकार आहे. आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आहे का? हा प्रश्न आता आहे. जबरदस्ती कराल तर उद्रेक होईल. आमच्यावर केसेस दाखल करत दाबण्याचा प्रयत्न केला, तर चुकीचे ठरेल, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, १९६० पासून प्रेमाने सांगायचे, मूळात विषय असा आहे, उत्तर भारतीय रिक्षा चालकांना आमचे लोक भेटले. ते म्हणतात की, आम्ही शिकायला तयार आहे. मग संजय निरुपम आणि शशांक राव आणि निरुपम यांनाच काय अडचण आहे, अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Deshpande slams Nirupam, invokes Dighe over Marathi language issue.

Web Summary : Sandeep Deshpande criticized Sanjay Nirupam over the Marathi language dispute, suggesting Anand Dighe would have taken action. He questioned the police's support for Nirupam and urged the government to uphold Marathi pride.
टॅग्स :संदीप देशपांडेमनसेसंजय निरुपमशिवसेनामराठीऑटो रिक्षाटॅक्सी