शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:17 IST

Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri Controversy on Chhatrapati Shivaji Maharaj: नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकारण तापले आहे

Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri Controversy on Chhatrapati Shivaji Maharaj: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरात एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. श्री आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित भारतदुर्गा शक्ती स्थळाचा जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात शिलान्यास सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता सोडण्याचे ठरविले होते असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हे मुकूट व सत्ता तुम्ही सांभाळा, असे ते त्यांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले की ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते," असा दावा धीरेंद्र शास्त्री यांनी केला.

हेही वाचा: चार मुले जन्माला घाला, त्यातील एक RSSला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे विधान

"या भोंदूला शिव्या द्या... आहे का हिंमत?"

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्ट केली. "छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीचा जाहीर निषेध! छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी स्वराज्य उभे केले होते. स्वराज्य उभारताना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही इमादशाही यांच्यासह उत्तरेतील मोगल, प्रदेशातून आलेले इंग्रज, डच, फ्रेंच या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर गुडघे टेकले. हा जाज्वल्य इतिहास असताना धीरेंद्र शास्त्रीने सार्वजनिक मंचावरून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान केला. सर्वात संतापजनक म्हणजे मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री गडकरी, संघाचे सरसंघचालक मंचावर बसलेले असताना धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू होता. असे असताना यातील कोणीही धीरेंद्र शास्त्रीला अडवले नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा मनुवादी भाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का? महाराष्ट्र धर्माला संपवण्याचा हा घाट आहे का? या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे, महाराष्ट्र धर्माला नख लावणाऱ्या प्रत्येक वृत्तीला वेळीच चाप बसला पाहिजे! स्वतःला छत्रपतींचे वंशज म्हणवणारे ते संजय गायकवाड कुठे आहेत? धीरेंद्र शास्त्रीला ढगात कधी पोहोचणार आहेत? या भोंदूला शिव्या द्या दणकून महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल.. आहे का हिंमत?" असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.

"या भोंदू धिरेंद्र शास्त्रीवर गुन्हा दाखल करून अटक करावी"

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही एक्स पोस्ट करत या विधानाचा निषेध केला. "संघ भाजपने पोसलेले, गायपट्ट्यातून महाराष्ट्रात येत आपला महाराष्ट्र धर्म नासवणाऱ्या या धीरेंद्र शास्त्री सारख्या ढोंगी बाबांना महाराष्ट्रातील जनतेनेच आता चपलांचा मार देत हाकलून लावायला हवे. आज तर या भोंदूने विधान केलेय की, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि थकलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावरचा मुकुट काढून रामदास स्वामींच्या चरणी ठेवला. आपला राज्यकारभार त्यांनी पाहावा अशी विनंती थकलेल्या महाराजांनी केली...” या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य या संघ भाजपच्या मनूवादी विचारसणीला नेहमीच खुपत आलंय. आज ही ढोंगी लोक या मराठी भूमीचं प्रेरणास्थान असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम या भोंदूकडून करून घेत आहेत, हा बोलका पोपट आहे. याने हे वक्तव्य केले तेव्हा मंचावर सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते, पण या विकृत बाबाला या महाराष्ट्राच्या या महान नेत्यांनी रोखलं नाही, यावरूनच लक्षात येतं, भाजप आणि संघ परिवारातील या मंडळींच्या मनात आपल्या महाराजांबद्दल किती खालच्या स्तराचे विचार आहेत. या वक्तव्याचा जाहीर निषेध, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जरा तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी या भोंदू धिरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करून अटक करावी," असे सपकाळ म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhirendra Shastri's statement on Shivaji Maharaj sparks controversy, arrest demanded.

Web Summary : Dhirendra Shastri's remark about Shivaji Maharaj sparked outrage. Congress demands his arrest for allegedly disrespecting the Maratha king. Leaders criticize the statement.
टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसnagpurनागपूर