लोकमत न्यूज नेटवर्कतुळजापूर (जि. धाराशिव): तुळजाभवानी मंदिरात देवीला अभिषेक घालण्यासाठी व सिंहासन पूजेसाठी मर्यादा घालून दिल्या आहेत. सकाळच्या सत्रात पाचऐवजी सहा सिंहासन पूजा झाल्याचे उघडकीस आले. यावरून मंदिर प्रशासनाने कठोर भूमिका घेत सहावी अनधिकृत पूजा करणाऱ्या पुजाऱ्यावर ५ वर्षांसाठी मंदिर प्रवेशबंदी घातली आहे. शिवाय, संगनमताचा ठपका ठेवून सुरक्षा एजन्सीलाही १ लाखाचा दंड केला आहे.
तुळजाभवानी मंदिरात मूर्ती संवर्धनाच्या उद्देशाने पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मर्यादित अभिषेक व सिंहासन पूजा करण्यात येतात. दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत पाच सिंहासन पूजा व उर्वरित अभिषेक पूजा केल्या जातात. तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत दोन सिंहासन पूजा व उर्वरित अभिषेक असा पूजेचा नित्यक्रम चालतो. मात्र, २१ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सहावे सिंहासन घातल्याप्रकरणी युवा भोपे पुजारी मंडळाने मंदिर प्रशासनाकडे तक्रार केली.
दुर्लक्षाबद्दल सुरक्षा एजन्सीला लाखाचा दंड
सुरक्षा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे एजन्सीला १ लाख रुपयाचा दंड व सिंहासन पावतीचे ११०० रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या काळात धार्मिक व्यवस्थापक म्हणून जे कर्तव्यावर होते, त्यांचीही चौकशी करून कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
Web Summary : A priest at Tulja Bhavani temple is banned for five years for performing an unauthorized sixth 'Sinhasan' puja. The security agency was fined ₹1 lakh for negligence during the incident.
Web Summary : तुळजा भवानी मंदिर में एक पुजारी को अनधिकृत छठी 'सिंहासन' पूजा करने के लिए पांच साल के लिए प्रतिबंधित कर दिया गया है। सुरक्षा एजेंसी पर लापरवाही के लिए ₹1 लाख का जुर्माना लगाया गया।