शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:37 IST

1 / 7
Bike Loan Required Cibil Score: दुचाकी खरेदी करण्यासाठी कर्ज घेणं सध्या अत्यंत सोपं झालं आहे, परंतु या प्रक्रियेत तुमचा क्रेडिट स्कोर सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. एक चांगला क्रेडिट स्कोर केवळ कर्जाची मंजुरी सोपी करत नाही, तर तुम्हाला कर्जाच्या चांगल्या अटी मिळवून देण्यासही मदत करतो.
2 / 7
बाइक लोनसाठी साधारणपणे किमान ७०० किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोर असणं आवश्यक मानलं जातं. हा स्कोर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची विश्वासार्हता दर्शवतो. तुम्ही तुमची पहिली बाइक खरेदी करत असाल किंवा जुनी बाइक नवीन बाइकशी अपग्रेड करत असाल, तुमचा क्रेडिट स्कोर समजून घेणं आणि तो सुधारणं अत्यंत गरजेचं आहे.
3 / 7
तुमचा सिबिल स्कोर ७२५ किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास कर्ज मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते आणि तुम्हाला चांगला व्याजदर मिळू शकतो. जर स्कोर ७०० ते ७४९ दरम्यान असेल, तर कर्ज मंजुरी शक्य असते आणि अटी सामान्य राहतात.
4 / 7
६५० ते ६९९ दरम्यान स्कोर असल्यास काही वित्तीय संस्था तुमच्या अर्जावर विचार करू शकतात, परंतु अशा स्थितीत व्याजदर जास्त असू शकतो. मात्र, ज्यांचा स्कोर ६५० पेक्षा कमी आहे, त्यांना कर्ज मिळणं कठीण होतं आणि अशा वेळी अतिरिक्त कागदपत्रं किंवा जामीनदाराची गरज पडू शकते.
5 / 7
प्रत्येक बँक कर्ज देण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट स्कोरचे सखोल मूल्यमापन करते. क्रेडिट स्कोर चांगला असण्याचे अनेक फायदे आहेत. चांगला स्कोर असल्यास कर्ज अतिशय वेगानं मंजूर होतं आणि तुम्हाला कमी व्याजदरानं कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. तसेच उच्च स्कोर असल्यास जास्त कर्ज रक्कम मंजूर होण्याची शक्यता अधिक असते. चांगला क्रेडिट इतिहास असल्यास कागदपत्रांची संख्या कमी होते आणि बहुतेक प्रकरणांमध्ये जामीनदाराची आवश्यकता भासत नाही.cibi
6 / 7
जर तुमचा सिबिल स्कोर ७०० पेक्षा कमी असेल, तर कर्ज घेण्यापूर्वी तो सुधारणं फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही सर्व कर्जे आणि क्रेडिट कार्डचे हप्ते तसंच बिलं वेळेवर भरली पाहिजेत. तुमच्या क्रेडिट मर्यादेचा वापर ३० टक्क्यांपेक्षा कमी ठेवावा. कमी कालावधीत वारंवार कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे टाळावं. तसंच आपला सिबिल रिपोर्ट नियमितपणे तपासावा आणि त्यात काही चूक आढळल्यास तो त्वरित दुरुस्त करावा. याशिवाय जुन्या बंद झालेल्या कर्ज खात्यांची माहिती क्रेडिट रिपोर्टमध्ये कायम ठेवल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
7 / 7
कमी सिबिल स्कोर असल्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकते. यामध्ये सर्वात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला जास्त व्याजदर मोजावा लागू शकतो. तसंच तुमच्या कर्जाची मंजूर रक्कम कमी असू शकते. बँक तुमच्याकडे अतिरिक्त कागदपत्रांची किंवा जामीनदाराची मागणी करू शकते आणि कमी स्कोरमुळे कर्ज प्रक्रियेसाठी अधिक वेळ लागू शकतो.
टॅग्स :bikeबाईकbankबँकMONEYपैसा